For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नील्स होल्कच्या प्रत्यार्पणास डेन्मार्कचा नकार

07:00 AM Aug 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
नील्स होल्कच्या प्रत्यार्पणास डेन्मार्कचा नकार
Advertisement

वृत्तसंस्था/कोपेनहेगन

Advertisement

डेन्मार्कने 1990 च्या दशकात पश्चिम बंगालमध्ये शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या नील्स होल्कचे प्रत्यार्पण करण्यास नकार दिला आहे. डेन्मार्कच्या एका न्यायालयाने याप्रकरणी निर्णय दिला आहे. न्यायालयाने मानवाधिकारांच्या उल्लंघनाची जोखीम असल्याचा दाखला देत 1195 च्या शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणी वाँटेड डेनिश नागरिकाच्या प्रत्यार्पणाची भारताची विनंती नाकारली आहे. भारत मागील अनेक वर्षांपासून नील्स होल्कला पश्चिम बंगालमधील उग्रवादी समूहाला सुमारे 4 टन शस्त्रास्त्रs पुरविल्याप्रकरणी प्रत्यार्पित करण्याची मागणी करत आहे. होल्कला भारतात पाठविणे डेन्मार्कच्या प्रत्यार्पण कायद्यांचे उल्लंघन ठरेल असे न्यायालयाने म्हटले आहे. भारताने वैध हमी दिली नाही. सरकारी वकील आणि भारतादरम्यान सशर्त चर्चेला 6 वर्षे झाली आहेत,

आरोपीच्या सुरक्षेची कुठलीच हमी नसल्याचे न्यायालयाचे म्हणणे असल्याचा दावा आरोपीचे वकील जोनास क्रिस्टोफरसेन यांनी केला. होल्कने यापूर्वी डेन्मार्कच्या एका न्यायालयासमोर एका रशियन कार्गो विमानाद्वारे पश्चिम बंगालमध्ये शस्त्रास्त्रतस्करी करत होतो अशी कबुली दिली होती.  होल्कला त्यावेळी किम डेवी नावाने ओळखले जात होते. ‘आनंद मार्ग’शी निगडित लोकांसाठी ही शस्त्रास्त्रs होती. आनंद मार्ग एक बंडखोरी आंदोलन होते, जे त्यावेळी पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असलेल्या डाव्या पक्षापासून कथित बचावासाठी चालविले जात होते. विमानाद्वारे पाडविण्यात आलेली शस्त्रास्त्रs अन्य ठिकाणी पडल्याने ती भारतीय अधिकाऱ्यांच्या हाती लागली होती. या घटनेनंतर संबंधितांवर खटला चालविण्यात आला होता. तर होल्कला भारतातच कैद करण्यात आले होते. यादरम्यान होल्क हा नेपाळमध्ये पळाला होता. तेथून 1996 मध्ये तो डेन्मार्कमध्ये परतला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.