महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

रशियात सैनिकांच्या पत्नींची निदर्शने

06:05 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

युक्रेन युद्धातून पतींना परत बोलाविण्याची मागणी

Advertisement

वृत्तसंस्था/ मॉस्को

Advertisement

रशियात आता सैनिकांच्या पत्नी आणि त्यांचे कुटुंबीय निदर्शने करत आहेत. युद्धात लढत असलेल्या सैनिकांना युक्रेनमधून परत बोलाविण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे. पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या 20 जणांना अटक केली असून यात प्रामुख्याने पत्रकारांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. 3 जानेवारी रोजी सकाळी सैनिकांच्या पत्नींनी निदर्शनांना सुरुवात केली होती. रशिया-युक्रेन युद्धाला 500 दिवस पूर्ण झाले असून सैनिकांचे कुटुंबीय रशियन राष्ट्रपती भवन-क्रेमलिनबाहेर सैनिकांच्या स्मृतिप्रित्यर्थ निर्माण करण्यात आलेल्या टुम्ब ऑफ द अननोन सोल्जरच्या ठिकाणी एकत्र आले होते. युद्धात मारले गेलेल्या सैनिकांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली आणि युक्रेनमध्ये लढत असलेल्या सैनिकांना परत बोलाविण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली आहेत.

माझा पती जिवंत रहावा

द वे होम ग्रूपच्या सुचनेनसार ही निदर्शने सुरू झाली. या ग्रूपने टेलिग्राम चॅनेलवर सैनिकांच्या पत्नी, बहिणी, मातांना सैनिकांच्या वापसीसाठी आवाज उठवा असे आवाहन केले होते. माझा पती जिवंत रहावा अशी माझी इच्छा आहे. पतीच्या जीवनाच्या बदल्यात मी कुठलीच भरपाई इच्छित नाही, केवळ माझा पती घरी परत यावा हीच इच्छा असल्याचे एका सैनिकाच्या पत्नीने सांगितले आहे.

भरपाईदाखल मिळाल्या भाज्या

युद्धात जखमी रशियन सैनिकांना भरपाईदाखल पैसे दिले जात नसल्याचा दावा एका प्रसारमाध्यमाने केला आहे. रशियाच्या सरकारने एका सैनिकाला भरपाईदाखल भाज्या पाठविल्या आहेत. 45 वर्षीय ओलेग रयबकिन हा जून 2023 मध्ये युद्धात जखमी झाला होता, त्याला रशियन सैन्याने लढण्यासाठी अयोग्य घोषित पेले होते. यानंतर त्याच्या कुटुंबाने भरपाईची मागणी केली होती. सरकारने पैशांऐवजी गाजर तसेच कांद्याने भरलेली पोती पाठवून दिली होती.

आजारी सैनिकांचा वापर

रशियाच्या सैनिकांमध्ये एक रहस्यमय आजार फैलावत असून यामुळे सैनिकांचे डोळे लाल होत असून ते उलटी करत आहेत.  तसेच सैनिकांची किडनी निकामी होत आहे. रशियन सैनिकांनी आजारावरून स्वत:च्या कमांडरांकडे तक्रारही केली. परंतु कमांडर्सनी याकडे दुर्लक्ष करत सैनिकांना युद्धभूमीवर पाठविण्याचे सत्र आरंभिले आहे. रशियाच्या सैनिकांना औषधे, प्रथमोपचार, अन्य वैद्यकीय सुविधा, उबदार कपडे देखील मिळत नसल्याची स्थिती आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article