For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी नायब तहसीलदार मनोज मुसळे यांचे निधन

सावंतवाडी नायब तहसीलदार मनोज मुसळे यांचे निधन
Advertisement

सावंतवाडी / प्रतिनिधी : सावंतवाडी प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार मनोज मुसळे (वय ५५, रा. कणकवली) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांना उपचारासाठी सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

Advertisement

मनोज मुसळे हे कणकवली शहरात वास्तव्यास होते. त्यांनी कणकवली, वैभववाडी, मालवण, कुडाळ तसेच सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून विविध ठिकाणी सेवा बजावली होती. सध्या ते सावंतवाडी प्रांत कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होते.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी सावंतवाडीचे प्रांताधिकारी समीर घारे यांनाही हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. त्यातून ते सध्या उपचार घेत आहेत. त्यानंतर आता प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार मनोज मुसळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने महसूल विभागासह सावंतवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

नायब तहसीलदार मनोज मुसळे यांच्या निधनाची माहिती मिळताच सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील आणि प्रांताधिकारी वीरसिंग वसावे यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.

Advertisement
Tags :

.