महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डिमॅट खातेदारांची वाढता वाढे, संख्या 15 कोटीपार

06:38 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मार्चमधील कामगिरी आली समोर

Advertisement

वृत्तसंस्था / मुंबई

Advertisement

शेअर बाजारात चढ उताराच्या प्रवासात मागच्या महिन्यात 31.2 लाख नवी डिमॅट खाती उघडण्यात आली आहेत. मार्चमध्ये एकंदर खात्यांचा आकडा 15 कोटी पार करु शकला आहे.

याआधी 19 महिन्यामागे डिमॅट खात्यांची संख्या 10 कोटीचा आकडा पार करु शकली होती. यावरुन हे स्पष्ट होते की भारतीय कुटुंबिय थेटपणे डिमॅट खाते उघडून शेअरबाजारात गुंतवणूक करु लागले आहेत. आर्थिक वर्ष 2024 मध्ये 3.7 कोटी नवी डिमॅट खाती उघडण्यात आली आहेत.

आर्थिक वर्षात सर्वाधिक

नव्या खात्यांच्या उघडण्याच्या संख्येचा विचार करता मागच्या आर्थिक वर्षात सर्वाधिक नवी डिमॅट खाती उघडण्यात आली आहेत. याच्या मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही संख्या 32 टक्के अधिक आहे. गेल्या 12 महिन्यात देशातील शेअरबाजारात तेजी राहिली होती, ज्यातून कंपन्यांच्या समभागांनी गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिल्याचे पाहायला मिळाले.

बाजाराचा दमदार परतावा

आर्थिक वर्ष 2024 मध्ये निफ्टी-50 निर्देशांकाने 29 टक्के वाढ दर्शवली होती. निफ्टी स्मॉल कॅप 100 आणि मिडकॅप 100 निर्देशांक यांनी अनुक्रमे 70, 60 टक्के इतका परतावा दिला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article