बीसीसीआयकडून लेखी खुलाशाची मागणी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ पाठविण्यास बीसीसीआयने स्पष्ट नकार दिला आहे. भारतीय शासनाकडून या प्रस्तावाला विरोध झाल्याने भारतीय क्रिकेट संघ या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने बीसीसीआयडकुन या संदर्भात लेखी खुल्याशीची मागणी केली आहे.
या स्पर्धेत भारतीय संघ पाकमध्ये पाठविला जाणार आहे, असे भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाकडून (बीसीसीआय) आयसीसीला औपचारिकरित्या कळविण्यात आले होते. दरम्यान पाककडून कोणत्या कारणास्तव भारतीय संघ पाकमध्ये पाठविला जाणार नाही, याचे पुरावे पाककडून मागितले जातील, असा खुलासा आयसीसीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आयसीसीने बीसीसीआयला या निर्णयाचा लेखी खुलासा पाठविण्यास सांगितले आहे. सदर स्पर्धा 2025 च्या 16 नोव्हेंबर रोजी इस्लामाबादमध्ये खेळविली जाणार आहे. भारत शासनाकडून परवानगी मिळाल्यास भारतीय संघ या स्पर्धेसाठी पाकचा दौरा करेल, असे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी गेल्यावर्षी सुचित केले होते.