तळवडे - खेरवाडी येथील बीएसएनएल टॅावर सुरू करण्याची मागणी
05:33 PM Feb 26, 2025 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
न्हावेली / वार्ताहर
तळवडे - खेरवाडी येथील बीएसएन एल टॉवरचे काम गेली दिड वर्ष पुर्ण झाले असून सेवा सुरु केलेली नाही,हा टॅावर तात्काळ सुरू करण्यात यावा अशी मागणी तळवडे ग्रामपंचायत सदस्य श्री.केशव परब यांनी केली.गेल्या दोन महिन्यापुर्वी बीएसएनएल कार्यालयात भेट देण्यात आली होती,त्या संबंधित अधिका-यांनी तात्काळ सेवा सुरु करण्याची हमी दिली होती परंतु आजपर्यंत सेवा सुरु केलेली नाही. तात्काळ सदरच्या टॉवरची सेवा सुरु करण्यात यावी सदरची सेवा तात्काळ सुरु न केल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबिला जाईल.यावेळी मंगलदास पेडणेकर,सुरेश मांजरेकर,सौ.स्मिता परब,सौ.नम्रता गावडे आदी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article