For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंडलगा-विजयनगर चौथा क्रॉस येथील समस्या सोडविण्याची मागणी

12:34 PM Sep 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
हिंडलगा विजयनगर चौथा क्रॉस येथील समस्या सोडविण्याची मागणी
Advertisement

बेळगाव : हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीतील विजयनगर चौथा क्रॉसजवळील लेआऊटच्या दुतर्फा झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद बनला असून, परिसरात साप व इतर प्राण्यांचा वावर वाढला आहे. पथदीपही नसल्याने अंधार पडत आहे. याचा फायदा घेत काही जण रस्त्याच्या कडेला कचरा फेकून देत असल्याने दुर्गंधी पसरण्यासह भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. गेल्या काही वर्षापासून रस्त्याची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खराब रस्त्यांवरून मोटरसायकली चालवणे धोकादायक बनले आहे. पथदीप नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. तसेच रात्रीच्या वेळी परिसरात मद्यपींचा वावरही वाढत आहे. जणू हा परिसर तळीरामांसाठी अड्डाच बनला आहे. याठिकाणी लोकवस्ती असल्याने रात्रीच्या वेळी महिलांना घराबाहेर पडणे धोकादायक बनले आहे. सकाळी व सायंकाळच्या दरम्यान फिरावयासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना कचऱ्याच्या दुर्गंधीचा सामना करण्याची वेळ आली आहे. झाडा-झुडपांमुळे साप व इतर प्राण्यांचा वावरही वाढला आहे. त्यामुळे ग्राम पंचायतीने या समस्येकडे लक्ष देऊन रस्त्याच्या कडेला वाढलेली झुडपे हटविण्यासह कचऱ्याची उचल करून रस्त्याचीही दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.