For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुक्यात औद्योगिक प्रकल्प उभारण्याची मागणी

09:46 AM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
तालुक्यात औद्योगिक प्रकल्प उभारण्याची मागणी
Advertisement

भाजपच्या तालुका अल्पसंख्याक अध्यक्षांचे खासदारांना निवेदन

Advertisement

खानापूर : खानापूर तालुका हा क्षेत्रफळाने मोठा आहे. तालुक्याचा विकास म्हणावा तसा झाला नाही. त्यामुळे तालुक्यातील युवक मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. गेल्या अनेक वर्षापासून उद्योग आणि व्यवसायानिमित्त गोवा, महाराष्ट्र येथे तालुक्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. याचा परिणाम ग्रामीण भागातील जनजीवनावर  झाला आहे. यासाठी खानापूर शहराजवळ मोठी आद्योगित वसाहत उभारुन या ठिकाणी चार-पाच हजार युवकांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, अशा मागणीचे निवेदन भाजपचे अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष जॉर्डन गोन्साल्विस यांनी खासदार विश्वेश्वर हेगडे यांना दिले आहे. यावेळी विद्यानंद बनोशी, दीपक वाळवेकर, विठ्ठल होसूर, कारू लिमा, फिलीप रॉड्रिक्स, मायकल अंद्रादे, रिचर्ड मिनेजीससह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत. खानापूर तालुक्यात उद्योग व्यवसाय नसल्याने तालुक्याच्या ग्रामीण भागातील युवक रोजगार मिळवण्यासाठी आणि उद्योग व्यवसायासाठी महाराष्ट्र आणि गोवा येथे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊन त्याच ठिकाणी स्थाईक होत आहेत.

खानापूर शहराच्या आसपास मोठी औद्योगिक वसाहत नसल्याने तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे तालुक्यातील युवक मोठ्या प्रमाणात बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे युवकात व्यसनाधिनता वाढलेली आहे. औद्योगिक वसाहत नसल्याने तालुक्याचा विकासही खुंटलेला आहे. तालुक्यातून बेळगाव येथे रोजगारासाठी रोज हजारो युवक ये-जा करतात. तसेच ग्रामीण भागातील स्थलांतर मोठ्या प्रमाणात झाल्याने याचा परिणाम ग्रामीण भागातील शाळा आणि इतर जीवनमानावर झालेला आहे. तालुक्याचा विकास आणि स्थलांतर रोखण्यासाठी खानापूर शहराच्या आसपास मोठा औद्योगिक प्रकल्प उभारण्यात यावा, त्यामुळे तालुक्यातील युवकांना रोजगार मिळेल, आणि तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल, यासाठी केंद्र आणि राज्य पातळीवर खासदार आणि खासदारानी प्रयत्न करुन औद्योगिक प्रकल्प आणि औद्योगिक वसाहत उभारण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.