कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आचरा बोरिवली बस पुन्हा सुरु करण्याची मागणी

05:20 PM Apr 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

आचरा प्रतिनिधी
कणकवली बस डेपोची काही वर्षांपूर्वी सुरू असलेली आचरा - बोरिवली बसफेरी बंद करण्यात आल्याने परिसरातील विविध गावांमधील प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे आचरा - बोरिवली बसफेरी पुन्हा सुरू करावी अशा मागणीचे निवेदन आज शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी यांना सादर करण्यात आले.दरम्यान मालवण आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांबाबत तसेच ज्या काही समस्या भेडसावत आहेत त्याची सविस्तर माहिती द्यावी. त्यानंतर आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा करून या समस्या सोडवण्यात येतील असे श्री. सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. तालुक्यातील आचरा येथून कणकवली डेपोची आचरा - बोरिवली बसफेरी काही वर्षापूर्वी सुरू होती. ती बंद केल्याने प्रवाशांना मुंबई कडे जाताना अन्य गाड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. सध्याच्या महागाईच्या काळात खासगी गाड्यांमधून प्रवास करणे सर्वसामान्य प्रवाशांना परवडत नाही. त्यामुळे आचरा - बोरिवली बसफेरी सुरू झाल्यास आचरा, चिंदर, त्रिंबक, पळसंब या ठिकाणच्या प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे ही बसफेरी पुन्हा सुरू करण्यात यावी. त्याचबरोबर आचरा - कोल्हापूर ही बसफेरीही सुरू करण्यात यावी अशी मागणी आगार व्यवस्थापक श्री. सूर्यवंशी यांच्याकडे करण्यात आली.यावेळी सरपंच जेरॉन फर्नांडिस, ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश कदम, शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, मनोज हडकर, जयप्रकाश परुळेकर, अजित घाडी, पंकज आचरेकर आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article