परभणी येथील संविधान प्रतिकृती तोडफोड घटनेचा सिंधुदुर्ग बसपातर्फे निषेध
समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
मालवण । प्रतिनिधी
परभणी येथील जिल्हा कार्यालयाजवळ असलेल्या भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृती काही समाजकंटकांकडून तोडफोड करून विटंबना करण्यात आली. या निंदनीय घटनेचा बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राज्यभर निषेध करण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून काल १२ डिसेंबर,२०२४ रोजी बहुजन समाज पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने या निंदनीय घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच हे निंदनीय कृत्य करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निषेध निवेदन मा.राज्यपाल महाराष्ट्र राज्य आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याद्वारे रवाना करण्यासाठी मालवण तहसीलदार यांच्या कार्यालयात निवासी नायब तहसीलदार श्रीम. चौगुले मॅडम यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले .यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. पी. के चौकेकर, जिल्हा प्रभारी श्री . सुधाकर माणगावकर , जिल्हा कोषाध्यक्ष श्री.नरेंद्र पेंडूरकर विधानसभा पदाधिकारी दुलाजी चौकेकर बामसेफचे श्री .विजय चौकेकर उपस्थित होते.