नवीन व्यापारी संकुलाला संत गाडगेबाबांचे नाव द्या
परीट समाजाची सावंतवाडी न. प . प्रशासनाकडे मागणी
सावंतवाडी -
सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या नव्या व्यापारी संकुलाला संत गाडगेबाबांचे नाव देण्यात यावे ,तसेच त्यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाजाच्या वतीने पालिका प्रशासनाकडे करण्यात आली . ८० वर्षांहून जुनी असणारी संत गाडगेबाबा मंडई जमीनदोस्त करण्यात आली आहे . त्याजागी आता लवकरच नवीन व्यापारी संकुल उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे . या जागेला संस्थानकालीन महत्त्व आहे . संत गाडगेबाबांनी याच जागी येऊन साफसफाई केली होती . त्यामुळे त्यांच्या या स्मृतींना जपण्यासाठी नव्या व्यापारी संकुलाला संत गाडगेबाबांचे नाव द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली . यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर , माजी नगरसेविका दिपाली भालेकर , राजेंद्र भालेकर ,दयानंद रेडकर , लक्ष्मण बांदेकर , योगेश आरोलकर, संजय होडावडेकर , किरण वाडकर , सुरेश पन्हाळकर , कृष्णा मडवळ , भगवान वाडकर , रितेश चव्हाण , रवींद्र होडावडेकर , जितेंद्र मोरजकर , मधुकर मोरजकर , संदीप बांदेकर , प्रतीक्षा मोरजकर , सुरेखा मोरजकर , राजश्री होडावडेकर , अनुजा होडावडेकर , शर्वरी होडावडेकर , इंद्रायणी होडावडेकर, सुधा बांदेकर , प्रीतमा मराठे , पुंडलिक मराठे , सुरेश चव्हाण , संदीप भालेकर नीला वाडकर , देवयानी मडवळ , भावना वाडकर आदी उपस्थित होते .