For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओलमणी येथे जीओची 5 जी सेवा सुरू करण्याची मागणी

12:49 PM May 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
ओलमणी येथे जीओची 5 जी सेवा सुरू करण्याची मागणी
Advertisement

नेटवर्क जामच्या समस्येने सिमकार्डधारक हैराण

Advertisement

वार्ताहर/जांबोटी

ओलमणी येथे जिओची 5 जी सेवा उपलब्ध नसल्यामुळे मोबाईलधारकांची गैरसोय होत आहे. जीओ कंपनीने येथील मोबाईल टॉवर्समधील तांत्रिक समस्या दूर करून त्वरित 5 जी, नेटवर्क सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. ओलमणी येथे गेल्या सात आठ वर्षांपासून जीओ दूरसंचार कंपनीमार्फत  मोबाईल टॉवर उभारल्यामुळे गावातील नागरिकांची महत्वाच्या संदेशाची त्वरित देवाणघेवाण करण्याची समस्या दूर झाली आहे. गावामध्ये हजारो मोबाईलधारकांनी जीओ कंपनीचे सिमकार्ड खरेदी केले आहेत. सध्या संपूर्ण देशभरात दूरसंचार कंपन्यांनी ग्राहकांसाठी फाईव्ह जी सेवा उपलब्ध केल्यामुळे माहिती तंत्रज्ञान तसेच इतर ऑनलाईन सेवांचा जलद लाभ घेणे सोयीस्कर झाले आहे.

Advertisement

तसेच जीओ दूरसंचार कंपनीने देखील ग्राहकांना 4 जी ऐवजी 5 जी सेवा सुरू केली आहे. मात्र ओलमणी येथील भ्रमणध्वनी मनोऱ्याच्या कार्यक्षेत्रामध्ये अद्याप फाईव्ह जी, नेटवर्क यंत्रणा कार्यान्वित केली नसल्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे. 5 जी सेवेसाठी पैसे मोजून देखील अद्याप 4 जी सेवेचाच लाभ मिळत असल्याने सिम कार्डधारकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. रात्रीच्या वेळी ग्राहकांना मोठ्या प्रमाणात नेटवर्क जामच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तसेच उपलब्ध नेटवर्क अत्यंत संथगतीने सुरू असल्यामुळे वर्क फ्रॉम होम आदी कामे करणाऱ्या गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

तसेच महत्वाच्या संदेशांची देवाण-घेवाण करण्याच्या दृष्टीने अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. शिवाय गावांमध्ये टॉवर्सच्या क्षमतेपेक्षा जादा सिमकार्डचा वापर होत असल्यामुळे जीओची सेवा अत्यंत संथगतीने कार्यान्वित होत असल्यामुळे डाऊनलोड अथवा अन्य अत्याधुनिक सेवेचा लाभ घेणे मुश्किल झाले आहे. तरी जीओ दूरसंचार कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने लक्ष घालून येथील मोबाईल टॉवर्समधील तांत्रिक समस्या दूर करून फाईव्ह जी सेवा कार्यान्वित करून ग्राहकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.