शक्तीपीठ महामार्गाऐवजी सावंतवाडी टर्मिनस तातडीने पूर्ण करावे
रेल्वे टर्मिनस प्रवासी संघर्ष समितीची मागणी
न्हावेली /वार्ताहर
कोकण रेल्वे मार्गावरील महत्वपूर्ण स्थानके आणि गोव्याचे प्रवेशद्वार असलेल्या सावंतवाडी येथे प्रस्तावित टर्मिनसच्या दिरंगाईमुळे स्थानिक नागरिक,प्रवासी आणि चाकरमानी यांच्यात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या शक्तीपीठ महामार्गाऐवजी कोकण रेल्वेचे सावंतवाडी टर्मिनस तातडीने पूर्ण करावे,अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.दहा वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते थाटामाटात सावंतवाडी टर्मिनसचे भूमिपूजन झाले होते.निधी मंजूर होऊनही रेल्वेमंत्री बदलल्यानंतर हे काम पूर्णत ठप्प झाले आहे.आजमितीस टर्मिनसच्या जागी फक्त भूमिपूजनाची कोनशिला उभी असल्याचे चित्र आहे.सावंतवाडी रेल्वे टर्मिनस झाल्यास लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळून पाणी भरण्याची सुविधा उपलब्ध झाली असती. प्रवाशांची गैरसोय वाढत असल्याने सावंतवाडी रेल्वे टर्मिनस प्रवासी संघर्ष समितीने आंदोलनात्मक भूमिक घेतली आहे.
प्रवाशांची वाढती नाराजी.....
कणकवली आणि कुडाळ स्थानकावर आठ रेल्वेगाड्याचे थांबे मंजूर झाले.असताना सावंतवाडी स्थानक मात्र अपेक्षितच राहिले आहे.सावंतवाडीकर नागरिक तळकोकणातील बांधवानी आगामी नगरपालिका,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत टर्मिनसचा मुद्दा जाहीरनाम्यात प्राधान्याने समाविष्ट करण्याची मागणी राजकीय पक्षांकडे केली आहे.नगरपरिषद निवडणुकीत सावंतवाडी टर्मिनसचा मुद्दा पुन्हा राजकीय केंद्रस्थानी आला आहे.