गणपती स्पेशल रेल्वे गाड्या सोडण्याची प्रवासी संघटनेची मागणी
न्हावेली / वार्ताहर
दरवर्षी गणेश उत्सवाला मुंबईतून लाखो चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात,गणेशभक्तांच्या तूलनेत कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणाऱ्या मेल / एक्सप्रेस अतिअल्प असल्याने यावर्षी कोकणाला गणपतीसाठी साधारणता: जादा ५०० फेऱ्यांची आवश्यकता आहे,गणेश चतुर्थी बुधवार दि.२७ ऑगस्ट २०२५ रोजी असल्याने १८ ऑगस्ट ते १० सप्टेबर दरम्याने कोकण रेल्वे मार्गावर प्रत्येक दिवसाला किमान ८ अप आणि ८ डाऊन अशा नवीन जादा गणपती स्पेशल रेल्वे सोडाव्यात तर दरम्यानच्या काळात कोकण रेल्वे वरील कंटेनर वाहतूक ( मालगाडया ) पूर्णतः बंद कराव्यात अशी मागणी प्रवासी संघटनेने कोकण रेल्वे,मध्य व पश्चिम रेल्वेकडे केली आहे. प्रवासी संघटनेच्या महत्वाच्या मागण्या १) गणेश चतुर्थी बुधवार दि.२७ ऑगस्टला असल्याने शुक्रवार दि.२२ ते २६ ऑगस्ट दरम्याने मुंबईतून कोकणात जाणाऱ्या ( Down मार्गावर ) रेल्वे जास्त सोडाव्यात.२) गौरी गणपती विसर्जन मंगळवार दि.२ सप्टेंबरला असल्याने ३ ते ७ सप्टेंबर दरम्यान कोकण ते मुंबईदरम्यान ( UP मार्गावर ) जादा गणपती स्पेशल सोडाव्यात.३) सर्व अनारक्षित रेल्वे गणपतीपुर्वी महिनाभर पहिल्या जाहीर कराव्यात.४) चाकरमाण्यांची जास्त लोकवस्ती ही मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरात असल्याने जादा रेल्वे पनवेल ऐवजीCSMT,दादर,कुर्ला,दिवा,वांद्रे,वसई, वलसाड येथून सोडाव्यात.५) मेमू रेल्वे १२ ऐवजी २२/२४ कोचच्या चालवाव्यात.६) गणपतीच्या दरम्याने माल वाहतूक रेल्वेसेवा बंद कराव्यात किंवा त्या पनवेल मिरज मार्गे मडगावला वळवाव्यात.७) नेहमीच्या सुपरफास्ट एक्सप्रेसना कोकणातील रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जादाचे हॉल्ट दयावेत.८) ११००३/०४ तुतारी एक्सप्रेस २४ कोचची चालवावी.९) दिवा रोहा मेमूचा विस्तार न करता नवीन मेमो रेल्वे मुंबई ते चिपळूण/ खेड दरम्यान चालवाव्यात.१०) कल्याणमार्गे पुणे ते सावंतवाडी दरम्यान रेल्वे चालवाव्यात.११) पश्चिम रेल्वेच्या वसईमार्गे वांद्रे, दादर,मुंबई सेंट्रल,वसई रोड, अहमदाबाद,उधना येथून रेल्वे चालवाव्यात.१२) मुंबई ते रत्नागिरी दरम्याने अनारक्षित डबल डेक्कन रेल्वे चालवाव्यात.१३) गणपती स्पेशल रेल्वे कर्नाटक/केरळपर्यंत न सोडता त्या मुंबई ते सावंतवाडी/मडगाव दरम्यानेच चालवाव्यात.यामध्ये सर्व मेमू रेल्वे १२ ऐवजी २२ किंवा २४ कोचच्या चालवाव्यात,कोकणातील चाकरमन्यांची वस्ती ही पश्चिम व मध्य रेल्वेच्या उपनगरात जास्त असल्याने जादा गणपती स्पेशल पनवेल ऐवजी दादर, वांद्रे ,वसई,कुर्ला व दिवा येथून सोडाव्यात,दिवा रोहा मेमूचा विस्तार चिपळूणपर्यंत करण्या ऐवजी मुंबई ते चिपळूण/खेड पर्यंत नवीन मेमू चालवाव्यात,कल्याणमार्गे पुणे ते सावंतवाडी दरम्याने एक्सप्रेस चालवाव्यात,गेल्यावर्षी अनारक्षित रेल्वे उशिराने जाहिर केल्याने त्याची माहीती चाकरमन्यांपर्यंत पोहोचली नाही परिणामी त्या रिकाम्याच धावत होत्या यावर्षी त्या लवकर जाहिर कराव्यात.यामध्ये मध्य रेल्वेच्या सीएसएमटी,दादर,कुर्ला,ठाणे,दिवा, कल्याण व पनवेल येथून तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल,वांद्रे,वसई,वलसाड,उधना,अहमदाबाद,सुरत येथून कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण,खेड,रत्नागिरी,कुडाळ,सावंतवाडी,पेडणे,थिमिव,करमळी,मडगाव दरम्याने आरक्षित जादा गणपती स्पेशल रेल्वे चालवाव्यात.तर गर्दी कमी करण्यासाठी वसई ते चिपळूण, पनवेल ते खेड,दिवा ते चिपळूण,दादर ते रत्नागिरी व पनवेल ते कुडाळ / सावंतवाडी दरम्याने अनारक्षित मेमू रेल्वे चालवाव्यात. गणपतीच्या कालावधीत 11003/04 तुतारी एक्सप्रेस २४ कोचची चालवावी किंवा दादर ते रत्नागिरी दरम्याने अनारक्षित डब्बलडेकर चालवाव्यात.बुधवार दि.२७ ऑगस्टला गणेश चतुर्थी असल्याने २२ ते २६ ऑगस्टला डाऊन मार्गावर मुंबईतून कोकणाच्या दिशेने जादा रेल्वे सोडाव्यात,तर मंगळवार २ सप्टेबरला गौरी गणपती विसर्जन असल्याने ३ ते ७ सप्टेबर दरम्याने अपमार्गावर कोकणातून मुंबईच्या दिशेने जास्त एक्सप्रेस सोडण्याची व्यवस्था करावी कारण हे भयंकर गर्दीचे दिवस आहेत. तसेच सिंगल ट्रकवर क्रासिंगला वेळ लागत असल्याने मुंबई ते मडूरा दरम्याने चाकरमन्यांचा प्रवास साधारण १८ ते २० तासाचा होतो म्हणून या गणपतीच्या दिवसामध्ये परतीच्या प्रवासातील सर्व जादा रेल्वे ( अप मार्गावरील ) मडगाव मिरजमार्गे पनवेलला वळवाव्यात.तसेच नियमित सर्व सुपारफास्ट एक्सप्रेसना गणपतीच्या कालावधीमध्ये रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये जादाचे थांबे दयावेत, अशा महत्वाच्या मागण्या प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे केल्या आहेत निवेदनाच्या प्रती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक श्री.संतोषकुमार झा,जनरल मॅनेजर : मध्य व पश्चिम रेल्वे मुंबई,रत्नागिरी व सिंधुदुर्गचे खासदार श्री.नारायण राणे,रायगडचे खासदार श्री.सुनिल तटकरे,पालघरचे खासदार मा.डॉ.हेमंत सावरा यांना पाठवल्या असून त्यावर अध्यक्ष श्री.शेखर बागवे व सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी सह्या केल्या आहेत.