रस्त्याच्या साईड पट्टीला बसणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना जागा द्या
सावंतवाडीतील नागरिकांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी शहरातील जुन्या घरांमध्ये जे जुने भाडेकरू आहेत त्यांना पालिका प्रशासनाने भरमसाठ कर लावला आहे. तसेच रस्त्याच्या साईड पट्टीला जे छोटे व्यापारी बसत आहेत त्यांना जागा द्या. मोती तलावाच्या फुटपाथवर तसेच मोती तलावात कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. सावंतवाडी बाजारपेठेत पालिका प्रशासनाचे काही कर्मचारी व्यापाऱ्यांकडून गुपचूपरित्या भाडे घेत आहेत असा अंधाधुंदी कारभार सध्या सावंतवाडी शहरात पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे. या कारभाराकडे मुख्याधिकारी सागर साळुंखे तुम्ही लक्ष द्या अशा विविध मागण्या घेऊन आज सावंतवाडी शहरातील सुज्ञ जागरूक नागरिक माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव ,उमाकांत वारंग, तानाजी वाडकर, अभय पंडित ,सत्यजित धारणकर, महेश नार्वेकर, सिताराम गावडे ,नंदू मोरजकर ,श्री इम्तहाज राजगुरू, यांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी साळुंखे यांची भेट घेतली. आणि तक्रारीचा पाढा वाचला. यावेळी श्री साळुंखे यांनी निश्चितपणे आपल्या सर्व समस्या व अडचणींचे निराकरण केले जाईल असे आश्वासन दिले.