‘वंदे भारत’ला विदेशातूनही तुफान मागणी
मलेशिया, चिली, कॅनडासह अनेक देशांनी खरेदीसाठी दाखवले स्वारस्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चिली, कॅनडा, मलेशिया या देशांनी भारतातून वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेगाड्या खरेदी करण्यात रस दाखवला आहे. या वाढत्या मागणीवरून वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांची विक्री लवकरच परदेशातही होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. इतर रेल्वेगाड्यांच्या तुलनेत वंदे भारतची किंमत कमी असल्यामुळे खरेदीदार वंदे भारतकडे आकर्षित होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
इतर देशांमध्ये उत्पादित वंदे भारतसारख्या रेल्वेगाड्यांची किंमत सुमारे 160 ते 180 कोटी ऊपये आहे. तर वंदे भारत टेनची किंमत 120-130 कोटी ऊपये आहे. वंदे भारत एक्स्प्रेस टेनचा वेग अधिक असल्याने आणि प्रवास आरामदायी असल्याने भारतीय प्रवासीही या रेल्वेगाड्यांकडे आकर्षित होताना दिसत आहेत. भारतीयांप्रमाणेच आता इतर काही देशही या रेल्वेगाड्यांवर भाळलेले दिसत आहेत. वंदे भारतची रचनाही परदेशी गाड्यांपेक्षा चांगली आहे. वंदे भारत गाड्या भारतात पहिल्यांदा 15 फेब्रुवारी 2019 रोजी मेक इन इंडिया योजनेअंतर्गत सुरू करण्यात आल्या होत्या. सध्या देशात 102 वंदे भारत गाड्या धावत आहेत. वंदे भारत टेनचा मार्ग देशातील 280 हून अधिक जिह्यांना जोडत आहे.
वंदे भारत टेनची खासियत
वंदे भारत एक्स्प्रेस टेनची रचना लोकांना खूप आवडलेली दिसते. शिवाय विशेष बाब म्हणजे याला विमानापेक्षा 100 पट कमी आवाज येतो आणि त्याचा उर्जेचा वापर खूप कमी आहे. वंदे भारतला 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठण्यासाठी केवळ 52 सेकंद लागतात. हा आकडा जपानच्या बुलेट टेनपेक्षाही चांगला आहे. जपानी बुलेट ट्रेनला 100 किमी प्रतितास वेग घेण्यासाठी 54 सेकंद लागतात.
वंदे भारत टेनमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि लोको पायलट आणि सेवा कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध आहेत. या टेनमध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्योही समाविष्ट आहेत. या टेनच्या मेन्टेनन्स स्टाफसाठी वेगळी केबिन बनवण्यात आली आहे. नजिकच्या काळात नव्याने येणारी स्लिपर वंदे भारत टेन एका फेरीमध्ये 800 ते 1000 किलोमीटरचे अंतर कापणार आहे.
जगातील सर्वोत्तम टेनमध्ये गणना : रेल्वेमंत्री
वंदे भारत स्लीपर टेनमध्ये कपलर मेपॅनिझमचे नवीन तंत्रज्ञान आणले आहे. टेन तयार करताना वजनाचा समतोल आणि स्थिरता लक्षात घेण्यात आली आहे. टेनचे कोच आणि टॉयलेट अपग्रेड करण्यात आले आहेत. चाक आणि ट्रॅकमधील यांत्रिक भाग खास डिझाईन करण्यात आला आहे. यामुळे टेनमधील कंपन आणि आवाज कमी झाला आहे. वंदे भारत स्लीपर टेनची गणना जगातील सर्वोत्तम टेनमध्ये केली जाईल, असा दावा अश्विनी वैष्णव यांनी केला आहे.