महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इदगाह मशिदीच्या सर्वेक्षणाची मागणी

06:45 AM Jan 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महामंडलेश्वर हिमांगी सखी यांना पोलिसांनी रोखले

Advertisement

वृत्तसंस्था/ मथुरा

Advertisement

ज्ञानवापीच्या पाहणी अहवालानंतर आता श्रीकृष्ण जन्मभूमी आणि मथुरेतील शाही ईदगाह मशीदचा वाद आणखीनच पेटताना दिसत आहे. आता मथुरेतील संत समाजही इदगाहच्या सर्वेक्षणाची मागणी करत आहे.

ज्ञानवापी प्रकरणाशी संबंधित भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचा (एएसआय)  अहवाल नुकताच सार्वजनिक करण्यात आला आहे. वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्ववेश यांच्या न्यायालयाने एएसआय सर्वेक्षणाचा अहवाल सार्वजनिक केल्यानुसार ज्ञानवापी संकुलात मंदिराची रचना सापडल्याचा दावा केला जात आहे. आता या सर्वेक्षणाची मागणी घेऊन किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर हिमांगी सखी वृंदावनात पोहोचल्या. महामंडलेश्वर हिमांगी सखी यांना शाही ईदगाहवर जाऊन आंदोलन करायचे होते, मात्र त्यापूर्वीच पोलिसांना माहिती मिळाल्याने त्यांना वृंदावन येथील आनंदधाम येथे नजरकैदेत ठेवण्यात आले. पोलिसांनी रोखल्याने संतप्त झालेल्या हिमांगी सखी यांनी आश्र्रमातच गोंधळ घालण्यास सुरू केली. यानंतर महामंडलेश्वर यांनी आपल्याला श्रीकृष्ण जन्मभूमी आणि बांकेबिहारी येथे जाण्याची परवानगी देण्याची विनंती पोलिसांकडे केली. ज्याप्रमाणे भगवान राम भव्य मंदिरात विराजमान आहेत, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णालाही लवकरच भव्य मंदिरात विराजमान करावे लागेल, असे त्यांनी सांगितले. तसेच संविधानाने दिलेल्या अधिकारांतर्गत आपल्या

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article