For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विशेष रेल्वेफेऱ्यांची मागणी

10:37 AM Dec 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विशेष रेल्वेफेऱ्यांची मागणी
Advertisement

सर्वच रेल्वेंचे बुकिंग फुल्ल झाल्याने प्रवाशांची होतेय गोची

Advertisement

बेळगाव : वर्षअखेर तसेच नाताळ याकाळात सुटीचा आनंद लुटण्यासाठी बाहेर फिरण्याचा बेत आखला जात आहे. यामुळे 1 जानेवारीपयर्तिं बेळगावमधून महत्त्वाच्या शहरांना रेल्वे बुकिंग फुल्ल असल्याचे दिसून येत आहे. ज्यांनी यापूर्वी तिकिटे बुक केली आहेत, ते वेटिंगवर असून गर्दीच्या मागर्विंर विशेष रेल्वेफेरी सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण एखाद्या नव्या शहराला जाण्याचा बेत आखतात. त्यातच विकेंडला जोडून नाताळ असल्याने शाळा व सरकारी कार्यालयांनाही सुट्या आहेत. त्यामुळे परगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यामुळे रेल्वेचे बुकिंग वेटिंग लिस्टवर सुरू आहे. विशेषत: बेंगळूर, मुंबई, पुणे, तिरुपती, हैदराबाद, एर्नाकुलम या मागर्विंर जाणाऱ्या रेल्वेंचे बुकिंग फुल्ल असल्याचे दिसून येत आहे.

बेळगाव-बेंगळूर मार्गावर दररोज बेळगावमधून दोन एक्स्प्रेस धावतात. यापैकी बेळगाव-बेंगळूर सुपरफास्ट एक्स्प्रेस बेळगावमधील प्रवाशांना सोयीची ठरते. परंतु, या एक्स्प्रेसचे बुकिंग पुढील काही दिवस फुल्ल असल्याचे दिसून येत आहे. वेटिंग लिस्ट 200 च्या पुढे पोहोचली असून तिकीट मिळणे अशक्य झाले आहे. त्यामुळे या मार्गावर पुढील आठवड्यात विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी केली जात आहे. बेंगळूरसोबतच तिरुपती मार्गावरही तिकीट बुकिंग फुल्ल आहे. बेळगावहून तिरुपतीला जाण्यासाठी एकच एक्स्प्रेस उपलब्ध आहे. परंतु, त्या एक्स्प्रेसचे नेहमीच बुकिंग फुल्ल असल्याने बेळगावकरांना खूपच कमी संधी मिळते. त्यामुळे हुबळी येथून प्रवास करावा लागत आहे. बेळगावच्या प्रवाशांसाठी तिरुपती, मुंबई, एर्नाकुलम अशा गर्दीच्या मागर्विंर एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.