स्कॉटलंडमध्ये करपलेल्या पावांना मागणी
काही लोकांना यात मिळतोय स्वाद
स्कॉटलंडमध्ये पावाच्या नावावर काही जळालेले पाव विकले जात आहेत. काळय़ा रंगाचे हे ब्रेड्स तसे पाहिल्यास कुणी खाऊ इच्छित नाही, परंतु काही लोकांना यातही कुरकुरीत आणि मजेदार स्वाद मिळत आहेत. घरात स्वयंपाक करताना खाद्यपदार्थ किंचित जरी करपले तरीही त्याचा गंध आणि स्वाद कुणालाच आवडत नाही. परंतु काही लोकांना जळालेल्या खाद्यपदार्थांचा स्वाद पसंत असतो. स्कॉटलंडमध्ये जळालेले पाव बाजारात सहजपणे विकले जात असून काही लोकांना ते आवडत देखली आहेत.
स्कॉटलंडच्या ऑथेंटिक स्वादात आगीत कडक भाजलेले ब्रेड देखील सामील आहेत. परंतु दिसण्यास ते जळालेले वाटतात. सध्या सोशल मीडियावर या ब्रेडची छायाचित्रे व्हायरल होत आहेत.
वेल फायर्ड रोल
सोशल मीडियावर वरच्या भागात करपलेल्या बेडची छायाचित्रे व्हायरल हो आहेत. स्कॉटलंडच्या अनेक लोकांच्या तोंडावर या पावांची चव रेंगाळत आहे. हे पाव वरच्या भागात कुरकुरीत असतात, तर आतून अत्यंत मऊ असतात. तेथे त्यंना या वेल फायर्ड रोल म्हटले जाते. ग्रेट मँचेस्टच्या हायडे इनडोअर मार्केटमध्ये हा विशेष प्रकारचा ब्रेड मिळतो. फेसबुक ग्रूप्सवर याची पोस्ट शेअर करण्यात आली असून लोक विविध प्रकारच्या कॉमेंट्स करत आहेत. काही लोकांनी तर याला क्रिमेटेड रोल देखील म्हटले आहे. 2018 मध्ये स्कॉटलंडच्या फूड स्टँडर्ड्स एजेन्सीकडून लोकांना अशाप्रकारचे बेड कमी खाण्याचा सल्ला देण्यात आला होता. कॅन्सर रिसर्च युके अक्रिलॅमाईडनुसार जळालेले टोस्ट, चिप्स आणि भाजलेले बटाटे कॅन्सर फैलावत नाहीत, परंतु त्यांचा समावेश आरोग्यदायी आहारात होत नाही.