For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केपीटीसीएल रोडवरील रस्तादुरुस्त करण्याची मागणी

10:34 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
केपीटीसीएल रोडवरील रस्तादुरुस्त करण्याची मागणी
Advertisement

बेळगाव : शिवबसवनगर येथील जेएनएमसीच्या जवळ केपीटीसीएल रोडवर एल अॅण्ड टीने पाण्याची पाईप लाईन घालण्यासाठी रस्त्याचे खोदकाम केले. परंतु पाईप लाईन घातल्यानंतर रस्ता पूर्ववत न करता केवळ तेथे खडी टाकून खोदकाम बुजविले आहे. यामुळे दररोज या ठिकाणी दोन ते चार लहान-सहान अपघात होत आहे. पाईपलाईनचे काम पूर्ण होवून 15 दिवस झाले तरी अद्याप रस्त्याचे पूर्ण दुरुस्ती केली नाही. पण याचा फटका वाहनचालकांना होत आहे. मोठा अपघात किंवा अनर्थ घडण्यापूर्वीच या रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.