For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनगोळ बससेवा पूर्ववत करण्याची मागणी

11:03 AM Nov 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
अनगोळ बससेवा पूर्ववत करण्याची मागणी
Advertisement

अन्यथा श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे आंदोलन

Advertisement

बेळगाव : अनगोळची बससेवा ही गेल्या एक वर्षाहून अधिक काळापासून पूर्णपणे कोलमडली आहे. गावामध्ये बस येत नसल्याने गावातील विद्यार्थी, महिला व नागरिकांना दररोजच मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सदर बससेवा लवकर पूर्ववत करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळतर्फे देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी नागनुरी यांना बुधवारी देण्यात आले. गेल्या एक वर्षांहून अधिक काळापासून अनगोळची बस ही गावातील शेवटच्या बसथांब्यावर न आणता गावच्या बाहेर थांबवत असल्याने गावातील सर्वांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सदर बस ही लक्ष्मी मंदिर या शेवटच्या बसस्थानकापर्यंत सोडावी, अशी मागणी विद्यार्थी व नागरिकांतून करण्यात आली आहे. परशुराम पुजेरी यांनी संबंधित विभागाशी चर्चा करून यावर तोडगा काढू, असे आश्वासन दिले आणि अनगोळ गावात लवकर बस पूर्ववत सुरू करण्यासाठी सहकार्य करू, असे सांगितले. दरम्यान,तसे न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ प्रमुख उमेश कुऱ्याळकर, संदीप लाटुकर, मनोज चवरे, मारुती हुंदरे, तुषार नेतलकर, समर्थ आदी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

टिळकवाडी पोलीस ठाण्याला निवेदन

Advertisement

गेल्या काही वर्षांपासून अनगोळची बससेवा गावात न येता अनगोळ मुख्य रस्त्यावरील मराठी शाळा नंबर 34 या ठिकाणी थांबत आहे. यामुळे गावातील सर्वच नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनगोळची बससेवा शेवटच्या बसस्थानकापर्यंत पूर्ववत करण्यासाठी आंदोलनासंदर्भात श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ विभाग यांच्यावतीने टिळकवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक परशुराम पुजेरी यांनाही निवेदन देण्यात आले.

Advertisement
Tags :

.