For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजा टाईल्स ते गोवा क्रॉस रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

10:29 AM Jul 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
राजा टाईल्स ते गोवा क्रॉस रस्ता दुरुस्त करण्याची मागणी
Advertisement

खानापूर : खानापूर शहरातून जाणारा तालगुप्पा महामार्ग राजा टाईल्स ते गोवा क्रॉस हा रस्ता सतत होणाऱ्या पावसामुळे पुन्हा खड्ड्यांनी व्यापला गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन वाहतूक करणे जिकिरीचे बनले आहे. रुमेवाडी क्रॉस ते गोवा क्रॉसपर्यंतचा रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी संपूर्ण खडी वर आली आहे. दुचाकी आणि चारचाकी घसरुन बाजूला जाण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच खड्डे पडल्याने खड्ड्यात पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज चालकांना येत नसल्याने या रस्त्यावर मोठ्या अपघाताची शक्यता व्यक्त होत आहे. यासाठी या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे. राजा टाईल्स ते गोवा क्रॉस हा रस्ता गेल्या चार वर्षापासून खड्डेमय बनलेला आहे. याबाबत मागील वर्षी आंदोलन झाल्याने तसेच करंबळ येथील महालक्ष्मी यात्रेनिमित्त राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची तात्पुरती डागडुजी केली होती.

Advertisement

मात्र गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या पावसाने हा रस्ता पूर्णपणे उखडून गेलेला आहे. तसेच घालण्यात आलेली खडी पावसाच्या पाण्यामुळे पूर्णपणे वर आली आहे. त्यामुळे वाहन चालवताना या खडीवरुन वाहने बाजूला जाण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच काही ठिकाणी खड्डे पडल्याने या खड्ड्यात पाणी साचत असल्याने वाहनचालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांना या खड्ड्यांतून वाहन चालविणे कठीण झाले आहे. राजा टाईल्स ते गोवा क्रॉस हा रस्ता महामार्ग प्राधिकरणाकडून नव्याने बनवण्यात येणार आहे. यासाठी 20 कोटीचा निधी मंजूरही झालेला आहे. मात्र सध्या या रस्त्याची दयनिय अवस्था झाली असून या रस्त्यावरुन वाहन चालविणे धोकादायक बनले आहे. यासाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता नव्याने होईपर्यंत रस्त्याची तात्पुरती डागडुजी करून हा रस्ता वाहतुकीस सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.