For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवासी शाळांमधील कर्मचाऱ्यांना सोयीसुविधा पुरविण्याची मागणी

11:03 AM Sep 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
निवासी शाळांमधील कर्मचाऱ्यांना सोयीसुविधा पुरविण्याची मागणी
Advertisement

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Advertisement

बेळगाव : वसतिगृह, निवासी शाळांमध्ये काम करणाऱ्या आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना दैनिक वेतनासह इतर सवलती द्याव्यात, या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. निवासी शाळांमधील स्वयंपाक मदतनीस, वॉचमन, क्लिनर, स्टाफ नर्स, अडेंटर, कॉम्प्युटर ऑपरेटर अशा गट क व ड मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. मागील पंधरा ते वीस वर्षांपासून आऊटसोर्सिंगद्वारे कर्मचारी काम करत आहेत. कोणत्याही सुविधा नसल्याने त्यांची पिळवणूक होत आहे. त्यामुळे या कामगारांना विभागाकडून थेट पगार द्यावा, सेवानिवृत्तीपर्यंत सेवासुरक्षा प्रदान करावी, दहा वर्षे केलेल्या कामगारांना दैनिक वेतन कल्याण कायद्यात आणावे, किमान वेतन 31 हजार निश्चित करावे, कामगार कायद्यानुसार साप्ताहिक रजा, कामांचे तास निश्चित करावेत. तसेच पे स्लीप, नियुक्त आदेशपत्र, ओळखपत्र, सेवाप्रमाणपत्र, ईएसआय, पीएफच्या सुविधा द्याव्यात, या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप दलवाई, लक्काप्पा कांबळे, रमेश पाटील, श्रीकांत सन्नकाई, लगमाण्णा हरिजन यांच्यासह इतर उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.