महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कार्यालयीन गाळ्यांची मागणी 16 टक्क्यांनी वाढली

07:00 AM Jun 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दुसऱ्या तिमाहीमधील स्थिती : मालमत्ता सल्लागार फर्म कॉलियर्सच्या अहवालात माहिती

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

देशात कार्यालयीन मागणी जोर धरू लागली आहे. प्रमुख शहरांमध्ये या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कार्यालयीन मागणीत 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा कार्यालयांची मागणी 5 कोटी चौरस फूटची मर्यादा ओलांडू शकते. कार्यालयांची मागणी ही पातळी ओलांडण्याचे हे तिसरे वर्ष असेल. या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत नवीन कार्यालयीन पुरवठाही वाढला आहे.

2024 च्या दुसऱ्या तिमाहीत कार्यालयीन मागणी किती होती?

मालमत्ता सल्लागार फर्म कॉलियर्सच्या अहवालानुसार, या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ऑफिस मार्केटने चांगली कामगिरी केली आणि 6 प्रमुख शहरांमध्ये 1.58 कोटी स्क्वेअर फूट ऑफिस मागणी नोंदवली गेली. हे प्रमाण पाहिल्यास मागील तिमाहीपेक्षा 16 टक्के अधिक आहे. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत या 6 शहरांपैकी 4 शहरांनी कार्यालयीन मागणीत 20 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली.

कोणत्या शहरात कार्यालयांची सर्वाधिक मागणी होती?

दुसऱ्या तिमाहीत बेंगळुरूमध्ये सर्वाधिक मागणी 48 लाख चौरस फूट नोंदवली गेली. यानंतर मुंबईत 35 लाख चौरस फूट मागणी दिसून आली. या दोन शहरांतील मागणी एकूण मागणीच्या निम्म्याहून अधिक होती. मुंबईत 119 टक्के आणि बेंगळुरूमध्ये 41 टक्क्यांनी कार्यालयीन मागणी वाढली आहे. या दोन्ही शहरांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर मागणी वाढण्याचे कारण म्हणजे बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रातील कार्यालयांच्या नव्या शाखांचा शुभारंभ होय.   कॉलियर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक (कार्यालय सेवा) अर्पित मेहरोत्रा म्हणाले की, देशातील कार्यालयांची मागणी सातत्याने वाढत आहे. या वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत 2.94 कोटी चौरस फूट कार्यालयाची मागणी नोंदवण्यात आली आहे, जी मागील याच कालावधीच्या तुलनेत 19 टक्क्यांनी अधिक आहे. दर्जेदार कार्यालयीन जागेची मागणीही सातत्याने वाढत आहे.

नवीन कार्यालयीन पुरवठा किती वाढला आहे?

यावर्षी कार्यालयीन मागणी वाढल्याने नवीन कार्यालयीन पुरवठ्यात वाढ झाली आहे. कॉलियर्सच्या या अहवालानुसार, 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत, नवीन कार्यालयीन पुरवठा 6 टक्क्यांनी वाढून 1.32 कोटी चौरस फूट झाला आहे. पहिल्या तिमाहीत हा आकडा 1.24 कोटी चौरस फूट होता. दुसऱ्या तिमाहीत, एकूण नवीन पुरवठ्यात 30 टक्के वाटा घेऊन मुंबईत सर्वाधिक 40 लाख चौरस फुटांचा पुरवठा होता. यानंतर हैदराबादने 36 लाख चौरस फूट पुरवठ्यात 27 टक्के वाटा नोंदवला. पहिल्या सहामाहीत नवीन कार्यालयीन पुरवठा 5 टक्क्यांनी वाढून 2.3 कोटी चौरस फूट झाला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article