For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pune Crime | श्रावणात मटणाची मागणी अन् वाद पेटला; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

04:59 PM Aug 28, 2026 IST | NEETA POTDAR
pune crime   श्रावणात मटणाची मागणी अन् वाद पेटला  वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू
Advertisement

Pune Crime | श्रावण महिन्यात मटणाचे जेवण बनवण्याची मागणी केल्यामुळे वडील आणि मुलामध्ये झालेल्या वादाला हिंसक वळण मिळाले. वडिलांनी केलेल्या मारहाणीत ३० वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात घडली.

Advertisement

याप्रकरणी मृत तरुणाच्या आई-वडिलांना अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव महेश भागवत गायकवाड असे आहे. पोलिसांनी त्याचे वडील भागवत सूर्यभान गायकवाड (वय ६४) आणि आई पार्वती भागवत गायकवाड (वय ६०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. वडिलांवर मुलाला मारहाण करून त्याचा जीव घेतल्याचा, तर आईवर पुरावे नष्ट करण्यास मदत केल्याचा आरोप आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.