For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Crime News | सोलापुरात विवाहितेच्या माहेराहून पैशांची मागणी; कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

04:02 PM Mar 11, 2026 IST | NEETA POTDAR
solapur crime news    सोलापुरात विवाहितेच्या माहेराहून पैशांची मागणी  कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
Advertisement

                             विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह चौघांवर गुन्हा

Advertisement

सोलापूर -विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सानिया पिरजादे (वय २२, रा. सिध्देश्वर नगर) विवाहितेच्या फिर्यादीवरुन पती अन्वर, दीर अल्ताफ, पतीचे आजोबा ताहेर, सावत्र सासू फरजाना (रा. श्रीशैल मल्लिकार्जुननगर, होटगी रोड, सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२०२३ ते १५ डिसेंबर २०२५ पर्यंत सानिया पती अन्वर याच्यासोबत नांदण्यास होत्या. पतीसह घरातील लोकांनी सानियास गैरेजसाठी माहेरून २० लाख घेऊन ये म्हणून छळ केला, सानियाला तलाक देतो, जिवे ठार मारतो अशी दमदाटी करून शिवीगाळ करून करत होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.