For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोबाईल हॅक करून पैशांची मागणी

07:11 AM Aug 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
मोबाईल हॅक करून पैशांची मागणी
Advertisement

अनगोळ येथील तरुणाची सायबर क्राईमकडे फिर्याद

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव

Advertisement

खासगी कंपनीतील एका कर्मचाऱ्याचा मोबाईल हॅक करून पैशासाठी त्याच्या संपर्कातील नागरिकांना मेसेज करणाऱ्याविरुद्ध सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एका खासगी कंपनीच्या प्रमुखांच्या नावाने मेसेज पाठवून पैसे पाठविण्याची सूचना केली जात आहे.

अनगोळ येथील सय्यद नामक युवकाने येथील सायबर क्राईम विभागात शुक्रवारी फिर्याद दिली आहे. अज्ञातांनी आपले मोबाईल हॅक केले आहेत. याबरोबरच आपण काम करीत असलेल्या खासगी कंपनीच्या प्रमुखांच्या नावे आपल्याला मेसेज पाठविण्यात येत आहेत. व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करून वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे जमा करण्यास सांगितले जात आहे.

तीन बँक खात्यावर रक्क्म जमा करण्याची सूचना

सय्यदचा मोबाईल हॅक करण्याबरोबरच हा युवक काम करीत असलेल्या खासगी कंपनीच्या प्रमुखांच्या नावेही वेगळे मोबाईल क्रमांक असल्याचे भासवत पैशासाठी मागणी केली जात आहे. यासाठी तीन बँक खात्यांचा तपशील पाठवण्यात आला असून या खात्यांवर रक्कम जमा करण्याची सूचना केली जात आहे.

सायबर क्राईम विभागात फिर्याद

29 जुलैच्या रात्रीपासून सुरू असलेल्या या प्रकारांबद्दल सय्यद यांनी सायबर क्राईम विभागात फिर्याद दिली असून ज्या मोबाईल क्रमांकावरून पैसे पाठवण्यासाठी मेसेज पाठवले जात आहेत, तो क्रमांक नमूद करून फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी पुढील तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.