For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

येळ्ळूर रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी

10:42 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
येळ्ळूर रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी
Advertisement

खचलेल्या रस्त्यावरुन वाहने चालविणे अवघड

Advertisement

वार्ताहर /येळ्ळूर

येळ्ळूर रस्त्यावरील विनायक मंदिरपासून येळ्ळूरपासूनचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्ता खचला असून त्यामधून वाहन चालविणे अवघड झाले आहे. खचलेल्या रस्त्यामुळे लहान-मोठे अपघात घडत आहेत. तेंव्हा तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी येळ्ळूरवासियांतून होत आहे. येळ्ळूरचा रस्ता दहा वर्षांपूर्वी करण्यात आला होता. त्यानंतर त्याची केवळ डागडुजी करण्यात आली आहे. या रस्त्याच्या बाजुला काळी जमीन आहे. याचबरोबर पावसाळ्यामध्ये दोन्ही बाजुला पूर येतो. त्यामुळे रस्ता खचला असून वाहने चालविणे कठीण झाले आहे. वास्तविक या रस्त्याची दुरुस्ती यापूर्वीच करणे गरजेचे होते. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. येळ्ळूर रस्त्यावरुन येळ्ळूरसह सुळगे (ये), देसूर, नंदिहळ्ळी, राजहंसगड, गर्लगुंजी, तोपिनकट्टी यासह खानापूर तालुक्यातील अनेक गावातील वाहने बेळगावला ये-जा करतात.

Advertisement

अवजड वाहनांमुळे रस्ता खराब

महत्वाचे म्हणजे अवजड वाहनांची वाहतूक अधिक आहे. परिणामी रस्ता खचत आहे. यातच हलगा-मच्छे बायपास व इतर रस्त्यांसाठी अवजड वाहनांतून खडी व माती वाहतूक करण्यात आली. त्यामुळे आणखीनच हा रस्ता खराब झाला. तेंव्हा तातडीने मोठा अपघात घडण्यापूर्वी व पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करावी. पावसाळ्यानंतर डांबरीकरण देखील करावे, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.