महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

नंदगड येथील बस निवारा शेड तातडीने उभारण्याची मागणी

10:18 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खानापूर : नंदगड येथील बस निवाराचे काम गेल्या दोन वर्षापासून अर्धवट स्थितीत राहिल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत असून हे बस निवाराचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी नंदगड परिसरातील नागरिकांकडून होत आहे. अन्यथा नंदगड येथील युवक आपल्या स्वखर्चाने या ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था करण्यात येईल, असा इशाराही येथील युवकांनी दिला आहे. माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या निधीतून खानापूर नंदगड रोडवर महात्मा गांधी हायस्कूलजवळील रस्त्याच्या बाजूला हे बस शेड उभारण्याचे काम सुरू होते. यासाठी कंत्राटदारांनी पायाही घालून प्लॅटफॉर्म निर्माण केला होता. मात्र काही राजकीय हस्तक्षेपामुळे हे काम थांबवण्यात आले आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे हे काम पूर्णपणे बंद पडल्याने शेडचे काम रेंगाळलेले आहे. नंदगड परिसरातून  बेळगाव, खानापूर या ठिकाणी प्रवासी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने बसने प्रवास करतात. यासाठी हे शेड त्या ठिकाणी उभारणी केल्यास प्रवाशांचे आणि विद्यार्थ्यांची चांगली सोय होणार आहे. मात्र काही राजकीय हस्तक्षेपामुळे हे शेड उभारण्यास अडथळा निर्माण झाल्याने त्या शेडचे काम थांबवण्यात आले आहे. आता पुन्हा शाळा महाविद्यालय सुरू होणार असून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात बेळगाव, खानापूरला येण्यासाठी या ठिकाणी बससाठी थांबतात. यासाठी या शेडची उभारणी येत्या आठ दिवसात करण्यात यावी, अन्यथा नंदगड येथील काही तरुणांनी आपण प्लास्टिकचे शेड उभारू, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article