कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राजा शिवछत्रपती चौकाच्या विस्ताराची मागणी

11:09 AM Nov 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जुन्या स्थानकात बस थांबविण्यासाठी नियोजनाची नितांत गरज

Advertisement

खानापूर : खानापूर शहराचे भूषण असलेले आणि शिवाजी महाराजांच्या विचाराची आणि आदर्शाची साक्ष देत उभी असलेली शिवस्मारकाची इमारत आणि खानापूर-हल्याळ रस्त्यावर जुन्या बसस्थानक चौकाला राजा शिवछत्रपती चौक म्हणून ओळखला जाणारा चौक आज वेगवेगळ्या अतिक्रमनाने संकुचित झाला आहे. याच कारणामुळे जुन्या बसस्थानकावर बसेस येण्याचे आणि थांबण्याचे बंद झाले आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहेत. यासाठी खानापूर शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी जुन्या बसस्थानकातून बसेस सोडण्याची मागणी लावून धरली होती. मात्र रस्त्याचे काम झाल्यानंतर बसेस सुरू करण्याचे आश्वासन आमदारानी दिले होते.

Advertisement

आता रस्त्याचे काम सुरू असल्याने या चौकाचा विस्तार करून शहराची शोभा वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच बस थांबण्याचा आणि सुटण्याचा प्रश्नही निकालात काढणे गरजेचे आहे. यासाठी लोकप्रतिनिधीनी गांभीर्याने घेऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. खानापूर शहराचा वाढता विस्तार आणि उपनगरामुळे शहराच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच जांबोटी क्रॉस ते राजा छत्रपती चौकापर्यंत बँका, सोसायट्या, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, दवाखाना, पोस्ट ऑफीस, रेल्वेस्थानक या परिसरात आहेत. राजा छत्रपती चौक हे शहराचे प्रवेशद्वार आहे. मात्र या चौकाचा विस्तार आणि सुशोभिकरण नसल्याने चौक असल्याचेही जाणवत नाही. तसेच संपूर्ण होर्डिंग आणि विक्रेत्यामुळे चौकात मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून शिवाजी चौक हा मुख्य बसस्थानक होता. मात्र जांबोटी क्रॉस येथे नवीन बसस्थानक उभारल्यानंतर या चौकात असलेल्या बसस्थानकाला जुना बसस्थानक म्हणून संबोधण्यात येऊ लागले. मात्र, याबसस्थानकावर शहरासाठी येणाऱ्या आणि शहरातून इतरत्र जाणाऱ्या बसेस याच ठिकाणी थांबत होत्या. त्यामुळे नागरिकांची मोठी सोय होत होती. मात्र बस आगार प्रमुखांनी गेल्या वर्षभरापूर्वी जुन्या बसस्थानकात बस थांबवणे आणि येथून बस सोडणे बंद केले. या विरोधात शहरातील सर्वपक्षीय नेत्यानी, व्यापारी आणि नागरिकांनी जुन्या बसस्थानकात बस थांबवण्यात याव्यात व सोडण्यात याव्यात यासाठी आंदोलन केले होते. त्यावेळी बस आगारप्रमुख आणि चालक, वाहकानी जुन्या बसस्थानकात बस वळविण्यासाठी अपुरी जागा असल्याचे कारण पुढे करून या ठिकाणी बस थांबवण्यास नकार दिला.

त्यानंतर आमदारानी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत जुन्या बसस्थानकाची पाहणी करुन राजा शिवाजी चौकाचा विस्तार केल्यास बस वळविणे सुलभ होणार असल्याचे स्पष्ट झाले हेते. त्यासाठी नियोजनही करण्याचे ठरवण्यात आले होते. तसेच शहरातील राजा टाईल्स ते करंबळ क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत नवीन बसस्थानकातूनच बस सोडण्यास अनुमती दिली होती. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा जुन्या बसस्थाकात पूर्वीप्रमाणे बस थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

करंबळ ते रुमेवाडी क्रॉसपर्यंतचे काम युद्धपातळीवर

आता रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून, करंबळ क्रॉस ते रुमेवाडी क्रॉसपर्यंतचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.जर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर जुन्या बसस्थानक चौकाचा विस्तार होणार नसल्यास रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच जुन्या बसस्थानकाचा विस्तार करणे गरजेचे आहे. यासाठी संपूर्ण चौकातील अतिक्रमण हटवून चारी बाजूनी चौकाचा व्यास वाढवणे गरजेचे आहे. तसेच शहराचे प्रेशद्वार असल्याने या चौकाचे सुशोभिकरण होणे गरजेचे आहे. यासाठी आमदारांनी तातडीने बैठक घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article