महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मार्कंडेय नदी पुलाच्या दुतर्फा स्वच्छतेची मागणी

10:14 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पुलाजवळील कचऱ्याची उचल करणे गरजेचे : पावसाळ्यात नदीचे पाणी दूषित, जनावरांना धोका

Advertisement

वार्ताहर /उचगाव

Advertisement

उचगावनजीक असलेल्या मार्कंडेय तीर्थक्षेत्राजवळील मार्कंडेय नदीच्या पुलाजवळ दुतर्फा नागरिकांनी टाकलेला कचरा, घरगुती टाकाऊ पदार्थ पडून आहे. पावसाळ्याला सुऊवात होताच नदी प्रवाहित झाली की सदर केरकचरा, टाकाऊ पदार्थ पाण्यात मिसळून वाहत इतरत्र पसरुन पाणी दूषित होते. ते दूषित होऊ नये यासाठी संबंधित खाते अथवा सेवाभावी संस्था, युवक मंडळे, रोजगार महिला मंडळ यांनी सदर केरकचरा काढावा, अशी मागणी होत आहे. उचगावनजीकच्या पुलाच्या दुतर्फा या भागातील अनेक नागरिकांनी प्लास्टिकचा कचरा, जीर्ण कपडे, नको असलेले देवाचे फोटो, पूजेचे साहित्य, निर्माल्य टाकून नदी दूषित केली आहे. पुढील येणाऱ्या पावसाळ्यात नदीच्या पाण्यात सर्व केरकचरा मिसळून नदीच्या पात्रातील पाणी दूषित होऊ नये तसेच या पाण्याचा उपयोग शेतकरी वर्ग जनावरांसाठी करत असतात. असे दूषित, रसायन मिश्रित विषारी पाणी जर जनावरांनी प्याले तर त्यांनाही मोठा धोका होऊ शकतो.

दुर्गंधीयुक्त पाणी आरोग्याला धोकादायक

याबरोबरच नदीच्या पात्रात शेतकऱ्यांनी अनेक विहिरी खणून त्याचे पाणी शेतातील पिकांसाठी घेतले आहे. याबरोबरच काही गावातील नागरिक पिण्यासाठीही याच पाण्याचा वापर करतात. नदीच्या पात्रात विहीर खोदकाम केलेले आहे. ते पाणी गावामध्ये असलेल्या जलकुंभात सोडून गावाला पुरवले जाते. असे दूषित, विषारीयुक्त पाणी नागरिकांनी पिण्यास वापरले तर मोठा अनर्थही घडू शकतो. या नदीच्या पात्रात टाकण्यात आलेले हे सर्व पदार्थ कुजून विषारी बनून, पाणी दुर्गंधीयुक्त तयार होते. हे पाणी नागरिकांच्या, जनावरांच्या आरोग्याच्यादृष्टीने घातक आहे. यासाठी या भागातील सेवाभावी संस्था, युवक मंडळे, ग्रामपंचायती, रोजगार महिला मंडळे यांनी पुढाकार घेऊन सदर नदीच्या पात्रात टाकण्यात आलेला हा निर्माल्य कचरा हटवावा आणि नदीच्या पात्रातून वाहणारे पाणी कसे स्वच्छ आणि पवित्र बनेल. यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज सध्याच्या घडीला नितांत आवश्यक आहे. थोड्याच दिवसात पावसाला सुरुवात होणार असल्याने पाऊस झाला तर नदी प्रवाहित होणार आणि या पाण्याबरोबर हा कचरा वाहत इतरत्र संपूर्ण नदीच्या पात्राबाहेर पसरु शकतो. यासाठी या नदीपात्राची आताच तातडीने स्वच्छता करणे गरजेचे आहे, असे अनेकांचे मत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article