For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्यमंत्र्यांच्या अल्कोहोल चाचणीची विधानसभेत मागणी

06:14 AM May 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुख्यमंत्र्यांच्या अल्कोहोल चाचणीची विधानसभेत मागणी
Advertisement

काँग्रेस-अकाली दलाकडून आरोप : सभापतींचा नकार

Advertisement

वृत्तसंस्था/ चंदीगड

कामगार दिनानिमित्त पंजाब सरकारने कामगारांना समर्पित विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित केले. यादरम्यान मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमध्ये किमान मजुरीत 15 टक्के वाढीची घोषणा केली आहे. परंतु या विशेष अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री मान हे मद्यपान करून सभागृहात पोहोचल्याचा आरोप काँग्रेस आणि अकाली दलाने केला आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसने गोंधळ घालत सभात्याग केला आहे. तसेच विधानसभेबाहेर विरोधी पक्षांच्या आमदारांनी ‘शराबी मुख्यमंत्री मुर्दाबाद’ अशी घोषणा दिली. राज्याच्या प्रमुखावर अशाप्रकारचे आरोप होणे अत्यंत गंभीर आहे. अल्कोमीटर मागवून सर्व सदस्यांची चाचणी करविण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रताप बाजवा यांनी केली आहे. कुठल्याही सदस्याच्या विरोधात अशाप्रकारचा आरोप स्वीकारला जाणार नाही असे विधानसभा सभापतींनी स्पष्ट केले, यानंतर काँग्रेस आमदाराने घोषणाबाजी कत सभागृहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

पंजाब सरकारच्या शुक्रवारच्या बैठकीत दोन मंत्र्यांसोबत गैरवर्तन झाले आहे. मुख्य सचिवांनाही लक्ष्य करण्यात आले. जर राज्य सरकार मद्यधुंद अवस्थेत विधानसभेत येत असेल तर हा विधानसभेचा अपमान आहे. डोप टेस्ट दूरची गोष्ट, अॅनालायजर टेस्ट करविण्यात यावी. मुख्यमंत्र्यांनी बहुमत चाचणी करवून घ्यावी किंवा नको, परंतु पंजाब विधानसभेच्या नेत्यांची ब्रेथ अॅनालायजर टेस्ट अवश्य व्हायला हवी असे भाजप प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.