महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डोंगरगाव शाळा विकासासाठी निधी मंजूर करण्याची मागणी

11:22 AM Nov 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

डोंगरगाव ग्रामस्थांचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन

Advertisement

खानापूर : तालुक्यातील डेंगरगाव येथील शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी तसेच शाळेच्या इतर विकासासाठी निधी मंजूर करण्यात यावा, यासाठी ग्रामस्थांनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन शाळेच्या विकासासाठी निधी मंजूर करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन नुकतेच देण्यात आले. याबाबत पालकमंत्र्यांनी आपण शाळेच्या विकासासाठी निश्चित प्रयत्न करू, असे आश्वासन दिले आहे. डोंगरगाव येथील मराठी शाळेची स्थापना 1957 साली झाली आहे. अतिशय दुर्गंम भागात असल्याने या शाळेचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. डोंगरगाव हे शिरोली ग्राम पंचायतीतील भीमगड अभयारण्याच्या क्षेत्रात येते. या शाळेत अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेले आहे. या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र शाळेच्या विकासासाचा खर्च मोठा असल्याने शासनाकडून  विकासासाठी निधी मंजूर करण्यात यावा, म्हणून डोंगरगाव ग्रामस्थांनी बेळगाव येथे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन शाळेच्या विकासासाठी निधी मंजूर करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन दिले आहे.

Advertisement

विकासाबाबत आराखडा तयार करण्याच्या सूचना

शाळेच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतची सर्व माहिती पालकमंत्र्यांना दिली आहे. तसेच डोंगरगाव शाळेची पाहणी करून विकासाबाबत आराखडा तयार करण्यासाठी आपल्या सचिवाना सूचना केल्या आहेत. पालकमंत्र्यांना निवेदन देताना डोंगरगाव ग्रामस्थांसह, माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article