कॅनडात हिंदू धर्मीयांची मागणी अखेर मान्य
अस्थिविसर्जनासाठी पहिल्यांदा मिळाले ठिकाण :
वृत्तसंस्था, ओटावा
कॅनडा सरकारने देशात राहणाऱ्या हिंदूंसाठी मोठा निर्णय घेतला आहे. ब्रिटिश कोलंबियाच्या सरे शहरात अस्थिविसर्जनासाठी अधिकृत ठिकाण निर्माण करण्यात आले आहे. या नव्या सुविधेमुळे हिंदूधर्मीयांना अंत्यसंस्काराच्या विधीसाठी भारतात यावे लागणार नाही. ते आता स्वत:च्या दिवंगत स्वकीयांच्या अस्थी कॅनडातच विसर्जित करू शकतील. हा प्रकल्प हिंदू समुदायाची मागणी पाहता सुरू करण्यात आल्याचे सरेच्या महापौर ब्रेंडा लॉक यांनी सांगितले.
अनेक परिवारांसाठी एखाद्या स्वकीयाच्या अस्थींना वाहत्या प्राण्यात प्रवाहित करणे एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक, धार्मिक आणि व्यक्तिगत रुपात महत्त्वपूर्ण प्रथा आहे. हा प्रकल्प एक सुरक्षित आणि सन्मानजक स्थान प्रदान करतो, जेथे परिवार स्वत:च्या स्वकीयांची आठवण आणि त्यांच्यासी सार्थक परंपरांचा सन्मान करण्यासाठी एकत्र येऊ शकतात असे लॉक यांनी म्हटले आहे.
ऑनलाइन बुकिंग
सरे प्रशासनाने 21 सप्टेंबरपासून या ठिकाणासाठी ऑनलाइन रिझर्व्हेशन सिस्टीम सुरू केली आहे. शहराच्या अधिकृत वेबसाइटवर स्वत:च्या सोयीनुसार स्लॉट बुक करावा लागणार आहे. याकरता संबंधित परिवाराला शुल्क भरावे लागणार असून ते प्रत्येक बुकिंगसाठी 237 कॅनेडियन डॉलर्स (जवळपास 14,500 रुपये) असेल. प्रारंभी हा एक वर्षासाठी प्रायोगिक प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आला असून जो पुढे वाढविण्याची योजना आहे.
नदी प्रदूषण टाळणार
या सुविधेला खासगीत्व, सुरक्षा आणि मर्यादित पोहोचसोबत डिझाइन करण्यात आले आणि एकावेळी केवळ एक परिवारच या ठिकाणाचा वापर करू शकेल. परिवारांना मदत आणि नदीत पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी शहर प्रशासनाचा एक कर्मचारी तेथे उपस्थित असेल. या ठिकाणी केवळ अस्थी विसर्जित करण्याची अनुमती असेल. यापूर्वी कॅनडातील हिंदू आणि शिखधर्मीयांना स्वकीयांच्या अस्थी विसर्जनासाठी भारतात आणाव्या लागत होत्या, कारण कॅनडातील नद्यांमध्ये अस्थी विसर्जनावर बंदी होती.