For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बनावट बांधकाम कामगारांवर कारवाई करण्याची मागणी

10:05 AM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
बनावट बांधकाम कामगारांवर कारवाई करण्याची मागणी
Advertisement

हावेरी जिल्हा युनियनचे सुवर्ण विधानसौधसमोर आंदोलन

Advertisement

बेळगाव : बांधकाम कामगारांची बनावट ओळखपत्रे तयार करण्यात आली असून, याचा फटका बांधकाम कामगारांना बसू लागला आहे. त्यामुळे बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना सेवासुविधांपासून वंचित रहावे लागत असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून बांधकाम कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी हावेरी जिल्हा बांधकाम कामगार युनियनच्यावतीने राज्य सरकारकडे करण्यात आली. कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक न बोलावताच बांधकाम कामगार व इतर कामगार कल्याणकारी मंडळाने नवीन आदेश जारी केले आहेत. बांधकाम कामगारांच्या नावावर इतर कामगारांचीही नोंदणी करण्यात आली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांचे व्यवहार झाले आहेत. अपात्र लाभार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात आले असल्याने मूळ लाभार्थी मात्र सुविधांपासून वंचित राहिल्याने अपात्र कामागारांना किती रक्कम वाटली, याची माहिती जाहीर करण्याची मागणी संघटनेने केली आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांची शिष्यवृत्ती अद्याप जमा झालेली नाही. त्याचबरोबर कामगार कल्याण मंडळाने सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्ती करण्याची मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली. अजयकुमार हडपद यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

Advertisement
Advertisement
Tags :

.