For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मूर्ती विसर्जनासाठी 100 रुपयांची मागणी

10:51 AM Sep 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
मूर्ती विसर्जनासाठी 100 रुपयांची मागणी
Advertisement

जक्कीनहोंडा येथील प्रकारामुळे गणेश भक्तांतून नाराजी

Advertisement

बेळगाव : गणेशोत्सवाला शनिवार दि. 7 रोजी प्रारंभ झाला. त्यानंतर दीड दिवसाचे, पाच दिवसाचे तसेच सात दिवसाचे गणेशमूर्ती विसर्जन विविध ठिकाणी केले जात आहे. रेल्वे ओव्हर ब्रिजजवळील जक्कीनहोंडा येथे घरगुती गणेशमूर्ती विसर्जन करण्यात येत आहे. मात्र विसर्जन करण्यासाठी तेथे काही जण 100 रुपये आकारणी करत असल्याचे सांगण्यात आले.  शहरातील गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी विविध तलावांची स्वच्छता करून त्याठिकाणी सर्व ती तयारी केली आहे. जक्कीनहोंडा येथेही ती सोय करण्यात आली आहे. मात्र विसर्जन करताना त्याठिकाणी महानगरपालिकेने कोणतीच दक्षता घेतली नाही.

त्यामुळे काही तरुण त्याठिकाणी थांबून गणेशमूर्ती विसर्जन करायचे असेल तर 100 रुपये द्या, म्हणून मागणी करत आहेत. अशा तक्रारी करण्यात आल्या आहेत. याबाबत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता आम्ही महानगरपालिकेतर्फे कोणाचीही अशाप्रकारे विसर्जन करण्यासाठी नेमणूक केली नाही. पैसे देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे सांगण्यात आले. कोणीही पैसे मागत असतील तर त्यांना ती रक्कम देऊ नका असेही आवाहन करण्यात आले आहे. तलावामध्ये मूर्ती मध्यंतरी नेऊन सोडण्यासाठी काहीजण रक्कम आकारत आहेत अशा तक्रारी येत आहेत. पण रक्कम कोणीही देऊ नये, असे सांगण्यात येत आहे. मात्र त्याठिकाणी महानगरपालिकेच्या एखाद्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.