रॉयल एनफील्ड ‘फ्लाइंग फ्ली सी6’ ची डिलिव्हरी सुरु
पूर्ण चार्जवर गाडी 154 किमी धावणार असल्याचा कंपनीचा दावा
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतीय दुचाकी उत्पादक रॉयल एनफील्डने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक बाईक ‘फ्लाइंग फ्ली सी6’ ची डिलिव्हरी सुरू केली आहे. कंपनीने बंगळूरमधून पदार्पण केले आहे. रॉयल एनफील्डने बंगळूरमध्ये एक समर्पित सेवा आणि सहाय्य नेटवर्क देखील उभारले आहे, जेणेकरून ग्राहकांना देखभाल किंवा चार्जिंगच्या समस्यांबद्दल काळजी करण्याची गरज भासणार नाही.
यामध्ये 3.91 केडब्लूएच बॅटरी पॅक आहे. पूर्ण चार्जवर दुचाकी 154 किमी धावणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर ही दुचाकी केवळ 3.7 सेकंदात 0 ते 60 किमी प्रति तास वेग गाठू शकते.
किंमत: बॅटरी सबक्रिप्शनसह 1.99 लाखपासून सुरू रॉयल एनफील्डने ही इलेक्ट्रिक बाईक दोन वेगवेगळ्या किंमतींच्या पर्यायांसह लॉन्च केली आहे. बॅटरी-ज-अ-सर्व्हिस: जर तुम्ही या प्रोग्राम अंतर्गत बाईक खरेदी केली, तर तिची किंमत 1.99 लाख (एक्स-शोरूम) आहे. हे वाहन आणि बॅटरीची किंमत वेगळी करते, त्यामुळे बाईक खरेदी करण्याचा सुरुवातीचा खर्च कमी होतो.
चार्जिंग तंत्रज्ञान: 2 तासांत पूर्ण चार्ज, मोबाईल अॅपवरून वेग नियंत्रित कराया इलेक्ट्रिक बाईकला 0 ते 100 टक्के चार्ज होण्यासाठी 2 तास 16 मिनिटे लागतात, तर 20 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी 1 तास 5 मिनिटे लागतात. विशेष गोष्ट म्हणजे रायडर मोबाईल अॅपद्वारे आपल्या सोयीनुसार चार्जिंगचा वेग देखील सेट करू शकतो.