For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीचा मुकाबला आज चेन्नई सुपर किंग्सशी

07:02 AM May 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीचा मुकाबला आज चेन्नई सुपर किंग्सशी
Advertisement

वृत्तसंस्था

Advertisement

नवी दिल्ली : मंगळवारी येथे होणाऱ्या ‘आयपीएल’ सामन्यात तितक्याच हताश असलेल्या चेन्नई सुपर किंग्सविऊद्ध सामना खेळताना दिल्ली कॅपिटल्सला घरच्या मैदानावर झालेल्या तीन वेदनादायक पराभवांच्या मालिकेतून बाहेर पडण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी आणि आत्मघातकी कामगिरी यादरम्यान हेलकावे खाणे थांबवावे लागेल. दोन्ही संघ नऊ सामन्यांनंतर आठ गुणांवर आहेत आणि पाच सामने शिल्लक असताना आता चुका करण्यास अजिबात वाव नाही.

सलग तीन पराभवांनंतर शुक्रवारी रात्री जयपूरमध्ये कॅपिटल्सने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करत एक स्वागतार्ह विजय मिळवला. वरीलपैकी दोन पराभव घरच्या मैदानावर झाले, ज्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये प्रचंड वेदना झाल्या. त्यात पंजाब किंग्सने 265 धावांचे विक्रमी लक्ष्य गाठले, तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने वेगवान गोलंदाजांच्या आक्रमणासमोर त्यांच्या कमकुवत फलंदाजीचे पितळ उघड केले. कोटला येथील पराभवांमध्ये गुजरात टायटन्सकडून एका धावेने झालेल्या पराभवाचाही समावेश आहे, जो सामना दिल्लीने निश्चितपणे जिंकायला हवा होता.

Advertisement

सीएसकेविऊद्धच्या सामन्याचा विचार करता दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वांत मोठी सकारात्मक बाब म्हणजे सलामीवीर पथुम निसांका सातत्यपूर्ण के. एल. राहुलसोबत लयीत येत आहे, तर वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क गोलंदाजीला आवश्यक धार देत आहे. जयपूरमध्ये आपल्या शेवटच्या षटकात तीन षटकार खाल्ल्यानंतर कुलदीप यादव चुका सुधारण्यासाठी उत्सुक असेल. या स्पर्धेत आतापर्यंत तो खूप महागडा ठरला असून नऊ सामन्यांमध्ये केवळ सात बळी घेताना त्याने प्रति षटक 10.26 धावा दिल्या आहेत.

मधल्या आणि अखेरच्या षटकांचा तज्ञ मानल्या जाणाऱ्या टी. नटराजनचा इकोनॉमी रेटही खूप जास्त असून त्याने नऊ सामन्यांमध्ये केवळ पाच बळी घेतले आहेत. अस्थिर कामगिरीनंतरही कर्णधार अक्षर पटेल मात्र शांत आणि व्यावहारिक राहण्यात यशस्वी झाला आहे. दुसरीकडे, हंगामातील 10 व्या सामन्यापूर्वी, सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी एम. एस. धोनी अद्याप पूर्णपणे तंदुऊस्त झालेला नाही, त्यामुळे तो कोटला येथील सामन्यात खेळणार नाही याला दुजोरा दिला आहे.

दिल्लीप्रमाणे सीएसके देखील नाजूक परिस्थितीतून जात आहे आणि जर आज त्यांची घसरण झाली, तर गेल्या हंगामात तळाशी राहिल्यानंतर स्पर्धेतून त्यांचे पुन्हा एकदा अकाली बाहेर पडणे निश्चित होईल. कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या बॅटमधून धावांचा अभाव त्यांना हंगामाच्या पूर्वार्धात खूप महागात पडला. परंतु कर्णधार पुन्हा लयीत आलेला आहे आणि सलग दोन अर्धशतकांमुळे वाढलेल्या आत्मविश्व़ासासह तो दिल्लीविरुद्ध मैदानात उतरेल. दुखापतग्रस्त आयुष म्हात्रेने माघार घेतल्यानंतर सर्फराज खानच्या आधी उर्विल पटेल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल की नाही यावर चर्चा सुरू आहे. मुंबई इंडियन्सविऊद्धच्या विजयात 12 चेंडूंमध्ये केलेल्या 14 धावा खेळी पटेलचा आत्मविश्वास वाढवून गेलेल्या असतील. कार्तिक शर्माच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. त्याने शनिवारी रात्री आपली पहिलीवहिली आयपीएल अर्धशतकी खेळी साकारली.

संघ-दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), के. एल राहुल, पथुम निसांका, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, मिचेल स्टार्क, मुकेश कुमार, टी. नटराजन.

चेन्नई सुपर किंग्स : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), संजू सॅमसन, शिवम दुबे, सर्फराज खान, जेमी ओव्हरटन, उर्विल पटेल, अंशुल कंबोज, अकेल होसेन, नूर अहमद, मॅट हेन्री मुकेश चौधरी.

सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.