For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्ली हादरली! 17 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला; सामूहिक अत्याचाराचा संशय, चौघे ताब्यात

11:36 AM Sep 19, 2026 IST | ABHIJEET RANJANE
दिल्ली हादरली  17 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला  सामूहिक अत्याचाराचा संशय  चौघे ताब्यात
Advertisement

नवी दिल्ली : दिल्लीतील स्वरूप नगर परिसरात 17 वर्षीय मुलीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार करून तिची चाकूने हत्या करण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी आतापर्यंत चौघांना ताब्यात घेतले आहे.

Advertisement

13 सप्टेंबर रोजी उत्तर-पश्चिम दिल्लीतील कुशक रोडवरील लाल बॉर्डरजवळील मोकळ्या मैदानात मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांसह क्राइम टीम आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने सुरुवातीला तो पुरुषाचा आहे की महिलेचा, हेही स्पष्ट होत नव्हते. पोलिसांच्या माहितीनुसार, मृतदेहाचा काही भाग भटक्या कुत्र्यांनी खाल्ल्याचे आढळले. एक हात शरीरापासून वेगळ्या अवस्थेतही सापडल्याचे सांगण्यात येत आहे.

तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील 50 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यातून एका संशयित टेम्पोचा माग काढण्यात आला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, पीडित मुलगी आरोपींच्या परिचयाची होती आणि ती एका मित्राला भेटण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्यानंतर ती संशयितांसोबत टेम्पोत गेल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisement

टेम्पोमध्ये संशयितांनी मद्यपान केल्यानंतर मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, घटनेचा संपूर्ण घटनाक्रम आणि प्रत्येक संशयिताची भूमिका अद्याप तपासाधीन आहे.

दरम्यान, मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलिसांकडे नोंदवली नव्हती. ती यापूर्वीही काही दिवसांसाठी घराबाहेर जात असे आणि नंतर परत येत असे, अशी माहिती कुटुंबीयांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेहाची ओळख आणि हत्येमागील नेमके कारण याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :

.