For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्ली पुन्हा हादरली; स्लीपर बसमध्ये 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; चालक-कंडक्टर पोलिसांच्या ताब्यात

12:08 PM Aug 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
दिल्ली पुन्हा हादरली  स्लीपर बसमध्ये 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार  चालक कंडक्टर पोलिसांच्या ताब्यात
Advertisement

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरली आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील 16 वर्षीय मुलगी भावाला भेटण्यासाठी दिल्लीकडे निघाली होती. यावेळी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने स्लीपर कोच बसचा चालक आणि कंडक्टर यांनी तिला बसमध्ये बसवले. त्यानंतर दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

Advertisement

या घटनेनंतर पीडित मुलीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. प्रकरणाची गंभीर दखल घेत काश्मिरी गेट पोलिसांनी बस चालक आणि कंडक्टर या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

पीडित मुलगी उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील असून, भावाला भेटण्यासाठी ती दिल्लीला येत होती. प्रवासादरम्यान आरोपींनी तिला मदतीचे आमिष दाखवत बसमध्ये घेतले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Advertisement

अल्पवयीन मुलीशी संबंधित असल्याने पोलिसांकडून प्रकरणाची संवेदनशीलतेने चौकशी केली जात असून, घटनेशी संबंधित अन्य बाबींचाही तपास केला जात आहे.

Advertisement
Tags :

.