For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्ली आज हैदराबादविरुद्ध पुनरागमनाच्या तयारीत

06:50 AM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
दिल्ली आज हैदराबादविरुद्ध पुनरागमनाच्या तयारीत
Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisement

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल सोमवारी होणाऱ्या आयपीएल सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना संघाची निराशाजनक मोहीम पुन्हा ऊळावर आणण्याची इच्छा बाळगेल. दिल्ली कॅपिटल्सच्या अलीकडील पराभवांमुळे त्यांच्या मोहिमेला धक्का बसला आहे, परंतु प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानांवर मिळालेल्या यशामुळे त्यांनी प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. पॅट कमिन्सच्या संघाचा सामना करताना त्यांची नजर याच बाबीवर असेल.

अक्षर पटेल दुखापतग्रस्त असून 30 एप्रिल रोजी डाव्या हाताला दुखापत झाल्यानंतर तो केकेआरच्या फलंदाजीदरम्यान मैदानाबाहेर गेला होता. सदर अष्टपैलू खेळाडू पूर्णपणे बरा झाला आहे की नाही हे पाहावे लागेल. क्षेत्ररक्षण करताना अक्षरला दुखापत झाली खरी, पण तसे असूनही त्याने 23 चेंडूंत 43 धावा केल्या. तथापि, जखम पूर्णपणे बरी झाली नसेल, तर डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून त्याच्या वापराच्या मार्गात अडथळा येऊ शकतो. 10 सामन्यांतून 12 गुणांसह सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला घरच्या मैदानावर केकेआर आणि आरसीबीविऊद्ध स्वीकाराव्या लागलेल्या सलग दोन पराभवांनंतर विजयाचे मार्ग शोधण्याची नितांत आवश्यकता आहे.

Advertisement

गेल्या पाच सामन्यांमध्ये दिल्लीला तीन पराभवांचा सामना करावा लागला असल्याने ते आणखी अडचणी टाळण्याचा प्रयत्न करतील. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू फाफ डु प्लेसिस केकेआरविऊद्ध उत्तम अर्धशतक झळकावून फॉर्ममध्ये परतला असला, तरी खेळपट्टीशी जुळवून घेण्याची त्याची क्षमता हा चिंतेचा विषय आहे. के. एल. राहुल हा या हंगामातील दिल्लीचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने नऊ सामन्यांत 371 धावा केल्या आहेत. कमिन्स, मोहम्मद शमी आणि हर्षल पटेल यासारख्या गोलंदाजांना त्याला तोंड द्यावे लागेल. हैदराबादचे हे त्रिकूट फॉर्मात असल्यास कोणत्याही संघाचे गणित बिघडवू शकते.

अभिषेक पोरेलनेही वरच्या फळीत आक्रमक खेळ केला आहे, परंतु चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्यात त्याला अपयश आलेले आहे. दिल्लीच्या फलंदाजीची ताकद खोलवर असून अष्टपैलू विप्रज निगमसारखा गोलंदाजही तळाकडे जलद धावा काढण्याची क्षमता बाळगतो. पण दिल्लीची गोलंदाजी त्यांना विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा आत्मविश्वास देते. मिशेल स्टार्कच्या रुपाने त्यांच्याकडे अनुभवी वेगवान गोलंदाज असून त्यांच्या खात्यात दुष्मंथा चामीरा आणि मुकेश कुमारसारखे गोलंदाज आहेत. दुसरीकडे, सनरायझर्सना त्यांच्याकडे असलेल्या अनुभवाचा फायदा घेता आलेला नाही. शुक्रवारी गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

संघ

सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), इशान किशन, अथर्व तायडे, अभिनव मनोहर, अनिकेत वर्मा, सचिन बेबी, स्मरण रविचंद्रन, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, हर्षल पटेल, कामिंदू मेंडिस, विआन मुल्डर, अभिषेक शर्मा, राहुल कुमार, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद शमी, राहुल चहर, सिमरजित सिंग, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, एशान मलिंगा.

दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, कऊण नायर, के. एल. राहुल, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार, समीर रिझवी, दर्शन नळकांडे, डोनोवन फेरेरा, त्रिपुराना विजय, दुष्मंथा चमीरा, फाफ डू प्लेसिस, टी. नटराजन, अजय जाधव मंडल, मानवंथ कुमार एल., माधव तिवारी.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.