For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ध्रूव राठीच्या व्हिडिओवर दिल्ली उच्च न्यायालय कठोर

11:52 PM Jul 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
ध्रूव राठीच्या व्हिडिओवर दिल्ली उच्च न्यायालय कठोर
Advertisement

भावना दुखाविणारा कंटेंट अस्वीकारार्ह

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

युट्यूबर ध्रूव राठीच्या वादग्रस्त व्हिडिओवरून दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. सरकारच्या तक्रार अपीलीय समितीला (जीएसी) हा व्हिडिओ हटविण्याच्या मागणीच्या अर्जावर 15 दिवसांच्या आत निर्णय घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

Advertisement

हे प्रकरण ध्रूव राठीने 21 मार्च रोजी अपलोड केलेला युट्यूब व्हिडिओ ‘क्या हिंदू बीफ खा सकते हैं?’ ‘केरल स्टोरी 2 का पर्दाफाश’शी निगडित आहे. या व्हिडिओत हिंदू देवदेवतांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आल्याने कोट्यावधी लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप याचिकाकर्ते वकील अमित सचदेव यांनी केला आहे.

युट्यूबसारख्या इंटरमीडियरी

प्लॅटफॉर्मने याप्रकरणी योग्य खबरदारी बाळगायला हवी होती. आक्षेपार्ह अन् द्वेष पसरविणारा कंटेंट त्वरित हटविला जायला हवा होता. राठीचा व्हिहिओ समाजात फूट पाडणारा असल्याची भूमिका केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी मांडली आहे.

गुगलने व्हिडिओ हटवावा

हा व्हिडिओ गुगलने स्वत:हून हटविण्याचा निर्णय घ्यावा किंवा न्यायालयाने याप्रकरणी योग्य आदेश द्यावा. बहुसंख्याक समुदायाच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचविणाऱ्या कंटेंटला व्यासपीठ मिळू नये, असे  शर्मा यांनी सुनावणीवेळी म्हटले आहे.

15 दिवसांच्या आत निर्णय

कंपनीने स्वत:चे उत्तर याचिकाकर्त्याला दिले आहे आणि याप्रकरणी जीएसीसमोर अर्जही दाखल करण्यात आला असल्याचे गुगल कंपनीच्या वतीने उपस्थित वकिलाने न्यायालयाने सांगितले. यावर न्यायाधीश स्वर्णकांता शर्मा यांनी जीएसीला 15 दिवसांच्या आत अर्जावर निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे. सध्या न्यायालयाने व्हिडिओ हटविण्यावर अंतिम निर्णय दिलेला नाही. आता सर्वांच्या नजरा जीएसीच्या निर्णयावर लागून राहिल्या आहेत.

Advertisement
Tags :

.