दिल्लीसमोर आज फॉर्ममध्ये असलेल्या मुंबईचे आव्हान
दिल्लीसमोर वरच्या फळीच्या अपयशाची समस्या, सलामीच्या विजयामुळे मुंबईच्या आत्मविश्वासात वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
आयपीएल, 2026 हंगामातील आपल्या पहिल्याच घरच्या सामन्यात आज शनिवारी जेव्हा दिल्ली कॅपिटल्सचा सामना आत्मविश्वासाने भरलेल्या मुंबई इंडियन्सशी होईल तेव्हा सर्वांचे लक्ष प्रामुख्याने दिल्लीच्या फलंदाजीच्या वरच्या फळीवर असेल. गेल्या वर्षी सलामीच्या जोड्यांचे तब्बल सात वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या दिल्लीच्या संघाला या हंगामात अधिक स्थैर्याची अपेक्षा होती. परंतु सुऊवातीच्या संकेतांवरून असे दिसते की, ही समस्या अजूनही कायम आहे.
आपल्या पहिल्याच सामन्यात लखनौ सुपर जायंट्सविऊद्ध 142 धावांचे माफक आव्हान गाठताना कॅपिटल्सची वरची फळी झपाट्याने कोसळली, ज्यामुळे दिल्लीची अवस्था 4 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 26 धावा अशी बिकट झाली होती. मात्र त्यानंतर 22 वर्षीय ‘इम्पॅक्ट सबस्टिट्यूट’ समीर रिझवीने कमालीचा संयम आणि परिपक्वता दाखवत नाबाद अर्धशतक झळकावले. अनुभवी ट्रिस्टन स्टब्सच्या साथीने त्याने अभेद्य भागीदारी रचत दिल्लीला संकटातून तारले.
रिझवीचा निर्भीड फलंदाजीचा बाज नक्कीच लक्षवेधी ठरला असला, तरी फलंदाजीच्या वरच्या फळीतील कमकुवतपणा ही चिंतेची बाब असून जसप्रीत बुमराहसारख्या दिग्गज गोलंदाजाच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या माऱ्यासमोर ही चिंता आणखी वाढेल. कॅपिटल्स संघाकडे वरच्या फळीसाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. एक म्हणजे अभिषेक पोरेल, ज्याने गेल्या हंगामात आपल्या कौशल्याची झलक दाखवली होती आणि दुसरा म्हणजे पृथ्वी शॉ, जो आपल्या आक्रमक खेळासाठी ओळखला जातो. पण पृथ्वीला सातत्य राखण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
याउलट, दिल्लीची गोलंदाजी फळी मात्र ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या अनुपस्थितीतही अधिक आत्मविश्वासपूर्ण दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी आपल्या कमी वेगाच्या चेंडूंचा वापर अत्यंत खुबीने करत आहे, तर दुखापतीमुळे बराच काळ संघाबाहेर राहिलेल्या टी. नटराजनने एलएसजीविऊद्धच्या सामन्यात 3 बळी घेत मोलाची कामगिरी बजावली. मुकेश कुमारनेही चांगली गोलंदाजी केली. कुलदीप यादव आणि कर्णधार अक्षर पटेल या फिरकी गोलंदाजांच्या जोडीने अपेक्षेप्रमाणेच सामन्याच्या मधल्या षटकांमध्ये दबाव निर्माण केला आणि प्रतिस्पिर्ध्यांना मुक्तपणे धावा करण्यापासून रोखले.
वेगवान गोलंदाजीतील विविधता आणि फिरकी माऱ्याचे हे मिश्रण रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा यासारख्या खेळाडूंचा समावेश असलेल्या मुंबईच्या दमदार