For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्ली मुख्य सचिवांना मिळणार मुदतवाढ

06:13 AM Nov 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
दिल्ली मुख्य सचिवांना मिळणार मुदतवाढ
Advertisement

अरविंद केजरीवाल सरकारला दणका

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकारला दिल्लीचे विद्यमान मुख्य सचिव नरेश कुमार यांचा कार्यकाळ सहा महिन्यांनी वाढवण्याची परवानगी दिली. नरेश कुमार यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत होता. केंद्राला त्यांना 6 महिन्यांची सेवा वाढवायची असताना दिल्ली सरकार त्याला विरोध करत होते. त्यातूनही हा मुद्दा न्यायालयापर्यंत पोहोचला होता. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. परदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी मुख्य सचिव म्हणून नरेश कुमार यांचा कार्यकाळ वाढवण्यापासून रोखण्याची मागणी करणारी दिल्ली सरकारची याचिका खंडपीठाने फेटाळली. दिल्ली सरकारच्या वतीने वकील डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.