For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

दिल्ली-बेळगाव विमानसेवा नवीन वेळापत्रकानुसार

06:13 AM Oct 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
दिल्ली बेळगाव विमानसेवा  नवीन वेळापत्रकानुसार
Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

बेळगाव विमानतळातील विमान फेऱ्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या हिवाळी हंगामातील वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. बेंगळूरसाठी दोन, हैदराबाद, नवी मुंबई व दिल्ली या शहरांना विमानसेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. इतर शहरांच्या विमानसेवेची वेळ पूर्वीप्रमाणेच असली तरी दिल्ली-बेळगाव विमानफेरीमध्ये बदल करण्यात येणार आहे. यापूर्वी दिल्लीहून येणारे विमान हे सकाळच्या सत्रात येत होते. आता ते सायंकाळच्या सत्रात येणार आहे. सायंकाळी 4 वाजून 20 मिनिटांनी दिल्लीवरून विमान दाखल होणार असून सायंकाळी 4.50 वाजता पुन्हा दिल्लीला जाणार आहे. आठवड्यातील चार दिवस सोमवार, मंगळवार, गुरुवार व शनिवार ही विमानसेवा उपलब्ध असणार आहे.

बेंगळूर-बेळगाव-बेंगळूर या हवाई मार्गावर सकाळ व संध्याकाळ अशा दोन फेऱ्या उपलब्ध आहेत. तर हैदराबाद-बेळगाव व नवी मुंबई-बेळगाव या मार्गावर दैनंदिन फेऱ्या उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना या नव्या वेळापत्रकानुसार विमान प्रवास करावा लागणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.