For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा

06:54 AM Jan 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा
Advertisement

5 फेब्रुवारीला मतदान, 8 फेब्रुवारीला मतगणना

Advertisement

► वृत्तसंस्था / नवी दिल्ली

दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. या राज्यात मतदान 5 फेब्रुवारीला होणार असून मतगणना 8 फेब्रुवारीला होणार आहे. दिल्लीत विधानसभेचे 70 मतदारसंघ आहेत. सध्या या राज्याची सत्ता आम आदमी पक्षाच्या हाती आहे. आतीशी मारलेना या मुख्यमंत्री आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे पक्ष स्वतंत्ररित्या आव्हान देणार आहेत. त्यामुळे येथे तिरंगी संघर्ष होणार आहे.

Advertisement

विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यापूर्वी निवडणूक आयोगाने दिल्लीची अंतिम मतदारसूची प्रसिद्ध केली. दिल्लीत 1 कोटी 55 लाख 24 हजार 858 मतदार आहेत. नोव्हेंबर 2024 पासून मतदारसंख्येत 1.09 टक्के वाढ झाली आहे, अशीही माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

टीकेला ठोस प्रत्युत्तर

दिल्लीच्या मतदार सूचीसंबंधी आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांनी केलेल्या आरोपांना केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमार यांनी ठोस प्रत्युत्तर दिले आहे. मतदारसूची अद्ययावत करत असताना सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले आहे. तसेच सर्व कागदपत्रांची यथायोग्य छाननी करुनच मतदारसूची अद्यायावत करण्यात आली आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

इलेक्ट्रॉनिक यंत्रे निर्दोष

काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आणि निवडणूक पद्धतीवर अनेक आरोप केले आहेत. तथापि, हे सर्व आरोप धादांत खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे पूर्णत: निर्दोष असून त्यांच्यात कोणताही घोटाळा संभवत नाही. या यंत्रांच्या साहाय्याने निवडणूक निर्णय फिरवला जाऊ शकत नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली. काही पक्षांनी मतदार सूचींसंदर्भात आरोप केले आहेत. अनेक नावे वगळण्यात आली तर अनेक नवी नावे समाविष्ट करण्यात आली, असा आरोप आहे. तसेच काही विशिष्ट समाजघटकांना लक्ष्य करण्यात येऊन त्या समाजघटकातील मतदारांची नावे अधिक प्रमाणात वगळण्यात आली, असाही आरोप आहे. तथापि, हे सर्व आरोप केवळ राजकीय हेतूने करण्यात आले आहेत. आयोगाकडे नावे वगळण्यासंबंधीची आणि नावे समाविष्ट करण्यासंबंधीची सर्व माहिती आणि कागदपत्रे उपलब्ध आहेत, असे  स्पष्ट करत त्यांनी विरोधकांचे आरोप धुडकावून लावले आहेत.

व्हीव्हीपॅटचा हिशेब अचूक

गेल्या काही निवडणुकांमधील व्हीव्हीपॅटच्या मतांची गणना करण्यात आली आहे. या मतांची पडताळणी यंत्रमतदानाशी करण्यात आली आहे. ती अचूक असल्याचे दिसून आले आहेत. एकाही मताचे अंतर पडलेले नाही. ही सर्व पडताळणी प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीसमोर झाली आहे. ही सर्व कागपदत्रेही आयोगाकडे उपलब्ध आहेत, अशी माहितीही राजीव कुमार यांनी यावेळी दिली. मतदान यंत्रे आणि निवडणूक प्रक्रिया यांच्याविषयी सर्वांनी विश्वास बाळगावा. कोणीही बिनबुडाच्या शंका उपस्थित करू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दिल्लीचा सविस्तर निवडणूक कार्यक्रम

ड प्रशासकीय परिपत्रकात निवडणूक कार्यक्रमाची नोंद  10-01-2025

ड उमेदवारी अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक      17-01-2025

ड उमेदवारी अर्ज पडताळणी दिनांक           18-01-2025

ड उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस         20-01-2025

ड विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचा दिवस     05-02-2025

ड मतगणना करण्याचा दिवस                      08-02-2025

ड निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याचा अंतिम दिवस        10-02-2025

Advertisement
Tags :

.