संरक्षण समभाग तेजीत
06:22 AM Mar 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
मध्य आशियामध्ये असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर डिफेन्स म्हणजे संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग सोमवारच्या सत्रामध्ये तेजीत असताना पहायला मिळाले. इतर समभाग घसरणीत असताना डिफेन्सचे समभाग मात्र चमकले होते. अमेरिकेने इस्त्रायलसोबत इराणवर हल्ला केला असून यामुळे शेअरबाजारामध्ये घसरणीचा कल दिसून आला. याच दरम्यान डिफेन्स क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग मात्र दौडताना दिसले. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीस व आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी यांचे समभाग 13 टक्क्यांपर्यंत उसळले होते. या व्यतिरिक्त भारत डायनॅमिक व डाटा पॅटर्न्स यांचे समभाग 3 ते 4 टक्के मजबूत होत बंद झाले.
Advertisement
Advertisement