For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur : अटीतटीच्या लढतीत हरियाणाच्या विक्रांतवर मात; हिंदकेसरी सिकंदर शेख यांचा दणदणीत विजय

02:52 PM Jan 08, 2026 IST | NEETA POTDAR
solapur   अटीतटीच्या लढतीत हरियाणाच्या विक्रांतवर मात  हिंदकेसरी सिकंदर शेख यांचा दणदणीत विजय
Advertisement

                         पीर बावासाहेब कादरी यात्रेत कुस्तीला नवचैतन्य

Advertisement

दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज (मं.) येथील ग्रामदैवत पीर बावासाहेब कादरी यांच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्ती स्पर्धेने कुस्तीप्रेमींमध्ये मोठा उत्साह निर्माण केला. या स्पर्धेतील प्रमुख आकर्षण ठरलेल्या लढतीत हिंदकेसरी सिकंदर शेख यांनी हरियाणाच्या बलाढ्य मल्ल विक्रांत कुमार यांच्यावर अटीतटीच्या आणि चुरशीच्या लढतीत मात करत विजय संपादन केला.समाजसेवक अब्दुलकादर बडेजहागीरदार यांचा पुढाकारकाराने ही कुस्ती स्पर्धा झाली आहे.

संपूर्ण मैदानावर हजारो कुस्तीप्रेमींची उपस्थिती होती. दोन्ही मल्लांनी सुरुवातीपासूनच एकमेकांवर डावपेच, ताकद आणि अनुभवाची कसोटी लावली. हरियाणाच्या विक्रांत कुमार यांनी आक्रमक खेळ करत सिकंदर शेख यांना कडवे आव्हान दिले. मात्र संयम, ताकद आणि कौशल्याच्या जोरावर अखेर निर्णायक क्षणी सिकंदर शेख यांनी वर्चस्व सिद्ध करत विजय मिळवला.

Advertisement

या थरारक लढतीनंतर उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात विजेत्या मल्लाचे अभिनंदन केले. हिंदकेसरी सिकंदर शेख यांच्या विजयामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पीर बावासाहेब कादरी यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धा ही परिसरातील पारंपरिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारी ठरली. या स्पर्धेमुळे नवोदित कुस्तीपटूंनाही प्रेरणा मिळाली असून, ग्रामीण भागातील कुस्तीला चालना मिळत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

सरपंच मल्लिकार्जुन करके, गैसोद्दीन पाटील, यात्रा कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल येळूरे, पोलीस पाटील नागनाथ उंबरजे, जैनुद्दीन मकानदार, जैनुद्दीन शेख, एजाज काझी, शरणाप्पा बिराजदार, पोलीस पाटील तायताज पाटील, शेखमीर शेख, अहमद बडेजागीरदार यांच्यासह ग्रामस्थ व कुस्तीशौकीन उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.