For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रज्ञानंद कारुआनाकडून पराभूत, वैशालीलाही धक्का

06:24 AM Jun 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रज्ञानंद कारुआनाकडून पराभूत  वैशालीलाही धक्का
Advertisement

वृत्तसंस्था/ स्टॅव्हेंगर (नॉर्वे)

Advertisement

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदला अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनाविऊद्ध जोरदार लढतीनंतर पराभव स्वीकारावा लागला, तर जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या मॅग्नस कार्लसनने फ्रान्सच्या फिरोजा अलिरेझाचा आर्मागेडनचा पराभव केला.

16 गुणांसह कार्लसनने आपला जवळच्या प्रतिस्पर्धी हिकारू नाकामुरावरील आपली आघाडी आता 1.5 गुणांपर्यंत वाढवली आहे. जागतिक विजेता डिंग लिरेनने या स्पर्धेत शेवटी आपल्या किताबास साजेशी कामगिरी करताना नाकामुराला पराभवाचा धक्का दिला. आर्मागेडनमध्ये काऊआनाविऊद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतरही प्रज्ञानंद 13 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आणि अलिरेझापेक्षा पूर्ण गुणाने पुढे आहे. 10.5 गुणांवर असलेला काऊआना हा लिरेनच्या (6 गुण) पुढे आहे. लिरेनने नाकामुराच्या उत्साहावर पाणी ओतले आहे.

Advertisement

महिला विभागात आर. वैशालीला चीनच्या टिंगजी लेईच्या हातून आणखी एक पराभव पत्करावा लागला आणि ती चौथ्या स्थानावर फेकली गेली आहे, तर कोनेरू हम्पीला चीनची आघाडीवर असलेली खेळाडू वेनजून जूकडून पराभूत व्हावे लागलेले आहे. चीनच्या वेनजून जूने 16 गुणांसह विजेतेपदावरील दावा मजबूत केला आहे. चीनची टिंगजी लेई आणि युक्रेनची अॅना मुझिचूक तिच्याहून 1.5 गुणांनी मागे आहेत, तर 11.5 गुणांवर असलेली वैशाली चौथ्या स्थानावर आहे. ती 9 गुण झालेल्या हम्पीपेक्षा पुढे आहे. स्वीडनची अनुभवी पिया क्रॅमलिंग 6.5 गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे.

काऊआनाला क्लासिकलमध्ये बरोबरीत रोखण्यासाठी प्रज्ञानंदला फारसा घाम गाळावा लागला नाही. परंतु आर्मागेडनमध्ये अमेरिकन खेळाडू पूर्णपणे बदललेला दिसला आणि त्याने पांढऱ्या सेंगट्यांच्या अनुकूलतेचा फायदा उठविला. प्रज्ञानंद आता शेवटच्या फेरीच्या सामन्यात नाकामुराविरुद्ध पांढऱ्या सोंगट्या घेऊन खेळेल.

Advertisement
Tags :

.