महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विचारांशी गद्दारी करणाऱ्यांचा पराभव करा !

12:29 PM Nov 11, 2024 IST | Radhika Patil
Defeat those who betray the thoughts!
Advertisement

संगमेश्वर-कसबा येथील महाविकास आघाडीच्या प्रचार सभेतील प्रशांत यादव यांचे आवाहन

Advertisement

संगमेश्वर : 
छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीतून मला लढण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजत आहे. निवडणुकीच्या माध्यमातून होणारी ही लढाई खुद्दार विरुद्ध गद्दार अशी असल्याचे सांगताना मी निवडून येईन किंवा नाही माहित नाही, मात्र विकासाची कामे करतच राहणार असल्याचे प्रतिपादन चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांनी तालुक्यातील कसबा येथील महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत केले.

Advertisement

उमेदवार प्रशांत यादव यांनी आरवलीपासून गावभेट कार्यक्रमाला सुरुवात केली. आरवली, माखजन, करजुवे आदी गावांना भेटी देत ते सायंकाळी कसबा येथे आले असता कसबा गटाच्यावतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यांनतर झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, स्वाभिमानाची लढाई लढले, त्याच धर्तीवर ही लढाई आता जनतेने हाती घेतली आहे. येथील जनता उद्धव  ठाकरे, शरदचंद्र पवार या नेत्यांवर, महाराष्ट्रावर पक्षांवर प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी असल्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचे जाहीर केले. ज्या गद्दारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचले,
ज्या पवार साहेबांना वयाच्या ८४ व्या वर्षी वणवण फिरायला लावले, ते सर्वसामान्य जनतेला पटलेले नाही. त्यामुळे आज सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे. एक भक्कम असे कर्तृत्व आणि नेतृत्वाने नावाजलेले महाडिक कुटुंब माझ्याबरोबर आहे. आज आघाडीतील सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी माझ्यासोबत आहेत, मतदार संघ मोठा आहे, वेळेअभावी प्रत्येक ठिकाणी पोचणे शक्य नाही, अजून माझी अनेकजणांशी पुरेशी ओळख नाही, परंतु मी आपल्या सर्वांच्या विकासाच्या कल्पना पूर्ण करण्याचे आपणास आश्वासन देतो, असे सांगून सर्वांनी मला आपले बहुमूल्य मत देऊन विजयी करा, असे आवाहन प्रशांत यादव यांनी उपस्थितांना केले.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article